December 22, 2024

“शेतकरी कामगार पक्षाच्या जनआघाड्यांचे जिल्हाध्यक्ष जाहीर; दास, बाबनवाडे, ठाकरे, हुलके, मंडोगडे, वासनिक, शेख, भोयर, गव्हारे, आलाम यांची निवड”

1 min read

गडचिरोली, ऑगस्ट १८ : पंढरपूर येथे झालेल्या १९ व्या अधिवेशनात शेतकरी कामगार पक्षाच्या कामगार, शेतकरी, महिला, युवक, विद्यार्थी, शिक्षक, अल्पसंख्यांक, आदिवासी, भटके-विमुक्त, रस्ते-महामार्ग बाधीत शेतकरी-शेतमजूर अशा विविध जन आघाड्यांचे गठन करण्यात आले होते. प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती करण्यात येवून राज्यभरात या आघाड्यांची बांधणी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता. त्यानुसार गडचिरोली जिल्हा समितीच्या बैठकीत चर्चा करुन सदर आघाड्यांचे जिल्हाध्यक्ष निवडण्यात आले.

शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते यांनी जाहिर केलेल्या निवडीमध्ये चामोर्शी तालुक्यातील पलसपूर येथील पवित्र जगबंधू दास यांची कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष म्हणून करण्यात आलेली आहे. शेतकरी आघाडीचे जिल्हाध्यक्ष म्हणून गडचिरोली तालुक्यातील वसा येथील कार्यकर्ते गोविंदा वामनराव बाबनवाडे यांची तर पुलखल येथील ग्रामपंचायत सदस्या कविता भास्कर ठाकरे यांची महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी करण्यात आली. चामोर्शी तालुक्यातील फराडा येथील गुड्डू धर्मराव हुलके युवक आघाडीचे तर नवेगाव येथील अभिलाषा भक्तप्रल्हाद मंडोगडे यांची विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे. गडचिरोली येथील शर्मिश भिमराव वासनिक शिक्षक आघाडी, अल्पसंख्यांक आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पदावर रामनगर येथील शोएब सईद शेख तर मुडझाचे डंबाजी रामूजी भोयर यांची भटके-विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले. वाढत्या बळजबरी भूसंपादनाविरोधात आवाज उठविण्यासाठी गठीत केलेल्या रस्ते-महामार्ग बाधीत शेतकरी-शेतमजूर आघाडी जिल्हाध्यक्ष म्हणून चामोर्शी तालुक्यातील भिवापूर येथील कार्यकर्ते प्रभाकर नुसाजी गव्हारे तर सावेला येथील रामदास विठ्ठल आलाम यांची आदिवासी आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.

सर्व जन आघाड्यांचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष लवकरच आप आपल्या  विस्तारीत जिल्हा कार्यकारीणी जाहीर करणार असून पक्षाचे नेते भाई रामदास जराते, महिला नेत्या जयश्रीताई जराते, मध्यवर्ती समिती सदस्य भाई शामसुंदर उराडे, भाई संजय दुधबळे, भाई अक्षय कोसनकर, जिल्हा समितीचे सदस्य डाॅ. गुरुदास सेमस्कर, दामोदर रोहनकर, गंगाधर बोमनवार, पांडुरंग गव्हारे, प्रदिप आभारे, रामकृष्ण धोटे, तुळशिदास भैसारे, अशोक किरंगे, महागू पिपरे, देवेंद्र भोयर, योगेश चापले,चंद्रकांत भोयर, सुरज ठाकरे, राजकुमार प्रधान, सरपंच जया मंटकवार, निशा आयतुलवार, पोर्णिमा खेवले, हेमलता मुनघाटे, अप्सरा डोईजड, छाया भोयर, पोर्णिमा शेंडे, मोहिनी करकाडे, सोनाली कवडो यांनी नवनियुक्त जिल्हाध्यक्ष्यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिलेल्या आहेत.

About The Author

error: Content is protected !!