मुनघाटे महाविद्यालयात विद्यार्थी शिक्षकांनी घेतली तंबाखू मुक्तीची शपथ
1 min readकुरखेडा, ऑगस्ट १९ : दंडकारण्य शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्था गडचिरोली द्वारा संचालित स्थानिक श्री गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालयाच्या टोबॅको अवेअरने सेंटर च्या माध्यमातून प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे यांच्या प्रमुख उपस्थित ,उप प्राचार्य पी. एस .खोपे, समन्वयक डॉ. रवींद्र विखार यांच्या उपस्थित महाविद्यालयात स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ध्वजारोहणाप्रसंगी तंबाखू विरोधी ची शपथ उपस्थित सर्वांना देण्यात आली.
श्री गोविंदराव मुनघाटे महाविद्यालयात मागील अनेक वर्षांपासून प्राचार्य डॉ.राजाभाऊ मुनघाटे यांच्या मार्गदर्शनात टोबॅको कंट्रोल अवेअरनेस सेंटर सुरू आहे. या माध्यमातून महाविद्यालयात दंतमुख रोग चिकित्सा शिबिर, तंबाखू विरोधी वर कार्य करणाऱ्या सलाम मुंबई फाउंडेशनचे तज्ञ मार्गदर्शकाचे मार्गदर्शन, तालुक्यातील यात्रेमध्ये तंबाखू मुक्ती वर जनजागृती, तंबाखू विरोधी वर पत्रके वाटप करणे, इत्यादी विविध उपक्रम राबविले असून उन्नत भारत अभियाना अंतर्गत दत्तक ग्राम जांभुळखेडा येथे दंत मुख रोग चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या संपूर्ण कार्याची दखल महाराष्ट्र शासनाने घेतलेली आहे आणि म्हणून महाराष्ट्र शासनाचा महात्मा गांधी व्यसनमुक्त पुरस्काराने महाविद्यालय सन्मानित झालेले आहे .सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले.