December 23, 2024

“कढोली खरकाडा रस्त्यालगत वीज पडून बैल ठार ,शेतकऱ्याचे नुकसान”

1 min read

“तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्या, भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष चांगदेव फाये यांची महसुल विभागाकडे कडे मागणी”

कुरखेडा, ऑगस्ट १९ : आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास कढोली खरकाडा रस्त्यालगत असलेल्या शेतात बैल चरत असताना अचानक वीज कोसळल्याने बैल जागीच ठार झाल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.

प्राप्त माहितीनुसार काढोली येथील दत्तेश्वर बळीराम मानकर हे नेहमीप्रमाणे बैल चराईसाठी घेवून रस्त्यालगत उभे होते. अचानक वीज कोसळली यात त्यांचे मटकीचे एक बैल जागीच ठार झाले. बैल मृतुमुखी पडल्याने शेतकऱ्याचे हजारो  रुपयांचे नुकसान होवून  त्यांच्यावर कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. घटनेची माहिती मिळताच कुरखेडा तालुका समन्वय व पुर्नरविलोकन समिती अध्यक्ष तथा भाजपा तालुका अध्यक्ष चांगदेव फाये यांनी घटनास्थळी भेट देत या संदर्भात आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कुष्णाजी गजबे तहसिलदार रमेश कुमरे पशुवैद्यकिय अधिकारी भामरे यांना संपर्क करून तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी केली आहे.
यावेळी भाजपा तालुका महामंत्री चंद्रकांत चौके, विजय पाटील नाकाडे, रोशन भोयर फाल्गुन ठाकरे, राजेश मानकर व गावातील नागरिक उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!