April 25, 2025

“तरुणीस अमानुषपणे मारहाण करणाऱ्या आरोपींच्या विरोधात एकवटले आरमोरीकर; कडकडीत बंद, सर्वपक्षीय भव्य जनआक्रोश मोर्चा”

आरमोरी, ऑगस्ट २० : १५ ऑगस्ट रोजी आरमोरी शहरातील शिवम रेस्टॉरंट येथे काम करणाऱ्या १९ वर्षीय युवतीस दोन युवकांनी व त्याला प्रोत्साहन देणाऱ्या इतर समाजकंटकांनी बेदम मारहाण केल्याची घटना  घडली होती.

या घटनेचा निषेध करण्यासाठी आरमोरी शहर कडकडीत बंद करून  सर्वपक्षीयांनी जनआक्रोश मोर्च्याचे आयोजन केले होते. आज सर्व दुकानदारांनी आपली दुकाने सकाळपासूनच पूर्णपणे बंद ठेवली होती. मारहाण झालेल्या युवतीला न्याय मिळवून देण्यासाठी व तिच्या समर्थनार्थ आज आरमोरी येथील वडसा टी-पॉइंटवर हजारो नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या गर्दीचे रूपांतर महामोर्चात झाले. जय भवानी , जय शिवाजी, भारत माता की जय असे घोषणा देत आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी मोर्चातील नागरिकांनी आरोपिंच्या विरोधात घोषणाबाजी केली. मोर्चा टी-पॉईंट येथून सुरू होऊन राज्य मार्गावरील मुख्य रस्त्याने हा मोर्चा इंदिरा गांधी चौकात जाहीर सभेत रूपांतरित झाले.

आमदार कृष्णा गजबे यांनी युवतीच्या मारहाण प्रकरणातील मुख्य सूत्रधार आरोपी सोहेल याची पत्नी असून तिला पोलिसांनी अटक करावी, तसेच आरोपी सोहेलने दंगा करण्यासाठी बोलविलेल्या १५ साथीदारांना दोन दिवसात अटक करावी अशी मागणी सर्वपक्षीयांच्या वतीने ठाणेदारांना निवेदनाद्वारे केली. परंतु नागरिकांचे समाधान न झाल्यामुळें आक्रमक झालेली मोर्चेकरूंनी आपला मोर्चा पोलीस स्टेशनकडे वळवीला. पोलीस स्टेशनच्या गेट जवळ मोर्चा येताच आरमोरी पोलिसांनी गेट जवळ तगडा बंदोबस्त ठेवला. यावेळी मोर्चेकरूंनी आरोपींना आमच्या ताब्यात द्या ,आरोपींना फाशी द्या अशी मागणी केली. यावेळी ठाणेदारांनी आरोपीवर कडक कारवाई करणार असे आश्वासन देताच मोर्चेकरूंनी आपला मोर्चा परत वळविला.  विविध संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते हजारोच्या संख्येने उपस्थित झाले होते. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!