मौशी येथे ५२ लिटर मोहफूलाची दारू जप्त ; आरोपीला अटक
1 min readकूरखेडा : पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मौशी येथे मोहफूलाच्या दारूची दारूची विक्री करण्यात येत असल्याच्या माहीतीवरून पोलिसांनी धाड टाकत ५२ लिटर मोहफूलाची दारू जप्त करीत आरोपीला अटक केली. शिवलाल मुरारी हलामी (वय ३८) रा. मौशी असे आरोपीचे नाव आहे.
कूरखेडा पोलीस स्टेशनच्या वतीने अवैध दारू विक्री विरोधात धडक मोहीम सूरू करण्यात आली असून सोमवार, १९ ऑगस्ट रोजी मौशी येथील मोहफूलाच्या दारू अड्ड्यावर धाड देण्यात आली व येथून १५ हजार ६०० रू. किमतीची ५२ लिटर दारू जप्त करून आरोपी शिवलाल हलामी याच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्याने गून्हा दाखल करीत अटक करण्यात आली. सदर कारवाई ठाणेदार महेंद्र वाघ यांच्या मार्गदर्शनात पोलीस नायक संतोष कांबळे, शिपाई प्रकाश साबले, महिला पोलीस शिपाई किरन मडावी यांनी केली.