गडचिरोली पोलीस दलाच्या वरीष्ठ अधिका-यांनी दुर्गम भागातील पोलीस मदत केंद्र गर्देवाडा येथे साजरा केला रक्षाबंधन
1 min readगडचिरोली , ऑगस्ट २१ : गडचिरोली जिल्हयातील माओवादग्रस्त व अतिदुर्गम, आदिवासी बहुल भाग म्हणुन ओळखले जाणा-या उपविभाग हेडरी अंतर्गत नव्याने स्थापन करण्यात आलेल्या पोलीस मदत केंद्र गर्देवाडा येथे पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख व अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. एम रमेश यांनी महिला पोलीस अंमलदारांचे मनोबल वाढविण्यासाठी भेट देवुन रक्षाबंधनाचा सण साजरा केला.
महिला पोलीस अंमलदार व शालेय विद्यार्थींनीनी घेतला सहभाग. सी-60 च्या जवानांनी फुले-आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क, गडचिरोलीच्या विद्यार्थीनींनकडुन राखी बांधुन घेत रक्षाबंधन साजरा केला. यावेळी पोमकें गर्देवाडा येथील महिला पोलीस अंमलदार व भगवंतराव आश्रमशाळा, गर्देवाडा येथील विद्यार्थींनींनी रक्षाबंधनाच्या उपक्रमात सहभाग घेवुन सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना राखी बांधली.
यावेळी कार्यक्रमास गावातील 80 ते 100 महिला पुरुष व 60 ते 70 शालेय विद्यार्थी उपस्थित होते. उपस्थित सर्वांना मान्यवरांच्या हस्ते विविध साहित्यांचे वाटप करण्यात आले. त्यानंतर पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांनी शुभेच्छा देतांना सांगितले की, गडचिरोली पोलीस दलात दुर्गम-अतिदुर्गम भागात पोस्टे/उपपोस्टे/पोमकें स्तरावर महिला पोलीस अंमलदार या पोस्टे सुरक्षा व माओवादविरोधी अभियानामध्ये अग्रभागी आहेत. अनेकवेळा कर्तव्यामुळे हा सण त्यांना पोस्टेवरतीच साजरा करावा लागतो. त्यांना कुटुंबात सहभागी होता येत नाही. कर्तव्याला प्रथम प्राधान्य देणा-या या महिला पोलीस अंमलदारांसोबत हा रक्षाबंधनाचा सण आज आम्हास साजरा करता आला. तसेच आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्वल भविष्याच्या व उपस्थित सर्वांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या.
यासोबतच खडतर परिस्थितीत सेवा देणारे सी-60 चे जवान अतिसंवेदनशील भागात सेवा देत असतांना आपल्या कुटुंबियांसोबत रक्षाबंधन सण साजरा करु शकत नाहीत. त्यामुळे सी-60 च्या अधिकारी व अंमलदार यांना फुले-आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क, गडचिरोलीच्या विद्यार्थीनींनी व प्राध्यापिका प्रज्ञा वनमाळी यांनी विशेष अभियान पथक कार्यालय, गडचिरोली येथे राखी बांधुन रक्षाबंधन सण साजरा केला. तसेच जिल्ह्रातील विविध पोस्टे/उपपोस्टे व पोमकें येथे रक्षाबंधनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन रक्षाबंधन सण उत्साहात साजरा करण्यात आला.
या प्रसंगी पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. एम रमेश यांचे सह सिआरपीएफचे एटापल्लीचे उप-कमांडंट श्री. राजीव सिंग व असिस्टंट कमांडन्ट विक्रम साकेत सोबतच पोमकें गर्देवाडाचे प्रभारी अधिकारी पोउपनि. शिंदे तसेच ईतर पोलीस अधिकारी व अंमलदार आणि शाळेतील शिक्षकवृंद उपस्थित होते.