April 26, 2025

“संदिग्ध स्थितीत युवतीचा शव मिळाल्याने कुरखेड्यात खळबळ”

कुरखेडा, ऑगस्ट २४ :  आज सकाळी येथील जिल्हा परिषद आवार परिसरात एका युवतीचे शव मृत स्थितीत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.  प्राप्त माहितीनुसार मृतकची ओळख ज्योती उर्फ चांदनी मसाजी मेश्राम २६ वर्ष अशी आहे.

आज सकाळी येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात क्रिकेट खेळण्यासाठी गेलेल्या युवकांना भिंतीला लागून युवतीचा शव दिसला. याची माहीती शहरात वाऱ्यासारखी पसरली. घटनास्थळावर बघ्यांची एकच गर्दी उसळली होती.  पोलिसांना घटनेची  सूचना मिळताच येथील उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र भोसले व कुरखेडा पोलिस स्टेशनचे ठाणेदार महेंद्र वाघ यांनी पोलीस ताफ्यासह घटना स्थळकडे धाव घेतली. घटना स्थळाचा पंचनामा करुन युवतीचा शव ताब्यात घेवून येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला असून प्राथमिक तपासात युवतीचा मृत्यू नेमका कश्यामुळे झालं हे सांगता येत नसल्याचे मत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. मृत्यूचे नेमके कारण पोस्टमार्टम नंतर स्पष्ट होईल.

मृतकच्या आई च्या म्हणण्यानुसार काल रात्रो मृतक १० वाजताच्या दरम्यान घराबाहेर गेली होती. ती उशिरा पर्यंत घरी परत न आल्याने  तिचा शोध घेतला असता मिळाली नाही. सकाळी तिच्या मृत्यूची बातमी कळताच मृतकच्या आई ने एकच हंबर्डा फोडला. काही दिवसा पूर्वी एका दुर्घटनेत मुलगा गमावलेल्या आई वर या घटनेने आकाशाएवढे संकट कोसळले आहे.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!