“चांदनीची हत्या गळा दाबून ; जुन्या पैश्याच्या वादातून हत्या केल्याची आरोपीची कबुली”
1 min read“संदिग्ध स्थिती युवतीचा शव मिळाल्याने कुरखेड्यात खळबळ माजली होती”
कुरखेडा, ऑगस्ट २४ : आज सकाळी येथील जिल्हा परिषद आवार परिसरात एका युवतीचे शव मृत स्थितीत आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी घटनेची गंभीरता लक्ष्यात घेता तीव्र गतीने तपास चक्रे फिरवत संदिग्ध आरोपिस ताब्यात घेत कसुन चौकशी केली असता आरोपी इकराम सलाम शेख वय ३० वर्ष याने जुन्या पैश्याच्या वादातून ज्योती उर्फ चांदनी मसाजी मेश्राम हिचा गळा दाबून हत्या केल्याची कबुली दिली आहे.
आरोपी विरोधात भा. न्याय संहिते च्या कलम १०३(१) अंतर्गत गुन्हा दाखल करून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे.
आज सकाळी येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात क्रिकेट खेळण्यासाठी गेलेल्या युवकांना भिंतीला लागून युवतीचा शव दिसला. याची माहीती शहरात वाऱ्यासारखी पसरली. घटनास्थळावर बघ्यांची एकच गर्दी उसळली होती. पोलिसांना घटनेची सूचना मिळताच येथील उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र भोसले व कुरखेडा पोलिस स्टेशनचे ठाणेदार महेंद्र वाघ यांनी पोलीस ताफ्यासह घटना स्थळकडे धाव घेतली होती. घटना स्थळाचा पंचनामा करुन युवतीचा शव ताब्यात घेवून येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला होता. मृतकाच्या शरीरावर कुठलेही जख्म किंवा मार लागल्याचे खुणा न्हवत्या त्यामुळे प्राथमिक वैद्यकीय तपासात युवतीचा मृत्यू नेमका कश्यामुळे झालं हे सांगता येत नसल्याचे मत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केले होते. आता पोस्टमार्टम द्वारे केलेल्या तपासणीत सदर युवतीची हत्त्या झाली असल्याचे समोर आले असून तिचा मृत्यू गळा दाबून झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
सदर प्रकरणाचा गांभीर्य लक्ष्यात घेता अतिरिक्त पोलीस अधीक्षक एम. रमेश हे सकाळीच कुरखेडा येथे दाखल झाले होते. उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनात कुरखेडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार महेंद्र वाघ घटनेचा पुढील तपास करीत आहेत.