“संस्कार पब्लिक स्कूल कुरखेडा येथे मोठया उत्साहाने श्रीकृष्ण जन्माष्टमी सण साजरा”
1 min readकुरखेडा, ऑगस्ट २५: युगात श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला भगवान विष्णूंनी श्रीकृष्ण म्हणून अवतार घेतला होता. हा दिवस श्रीकृष्ण जयंती, जन्माष्टमी म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पावन पर्वावर आदिवासी ग्रामीण विकास संस्था द्वारा संचालित संस्कार पब्लिक स्कूल कुरखेडा येथे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सणाचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी संस्कार पब्लिक स्कूल कुरखेडा येथे राधा कृष्णा वेशभूषा स्पर्धेचे आयोजन केले होते. यावेळी बालगोपाल विद्यार्थ्यांनी राधा कृष्ण बनून मोठ्या संख्येत सहभाग घेतला होता.
यावेळी अध्यक्षस्थाना वरून बोलताना विश्व हिंदू परिषद जिल्हा कार्याध्यक्ष वामनरावजी फाये यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या संदर्भात लहान बालगोपालांना बाल कन्हैयाच्या कथा सांगितल्या.
यावेळी प्रमुख अतिथी संस्था सचिव दोषहर फाये , शाळा समिती सदस्य चांगदेव भाऊ फाये,प्राचार्य देवेंद्र फाये, जेष्ठ शिक्षक नरहरी माकडे प्राध्यापिका नेहा फाये मॅडम उपस्थितीत होते.
या स्पर्धेचे परीक्षक म्हणून सौ. रुपाली फाये मॅडम, सौ. रूपाली तोंडरे मॅडम, सौ. श्रुती मांडवे मॅडम यांनी परिक्षण केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालन पारधी शिक्षिका तर आभार गिरडे शिक्षिका यांनी केले यावेळी मोठ्या संख्येत पालक व विद्यार्थी उपस्थित होते.