December 23, 2024

“डॉजबाल जिल्हा क्रीडा स्पर्धेत श्रीराम विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालयाचे सुयश; विभागीय स्तरावर झेप”

1 min read

कुरखेडा, ऑगस्ट २५: क्रीडा व युवक संचालन पुणे जिल्हा क्रीडा कार्यालय गडचिरोलीच्या यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हा क्रीडा स्पर्धेमध्ये श्रीराम विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय कुरखेडा यांनी घवघवीत यश‌ संपादन केले आहे.
१७ वर्षे वयोगट मुले व १९ वर्षे वयोगट मुले यामध्ये १७ वर्षे वयोगट मुले श्रीराम विद्यालय कुरखेडा यांनी गोंडवाना सैनिकी विद्यालय गडचिरोली या संघावर मात करून घवघवीत यश संपादन केले तसेच १९ वर्षे वयोगटातील श्रीराम विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय यांनी स्वामी विवेकानंद जूनियर कॉलेज गडचिरोली या संघावर मात करून आपला श्रीराम विद्यालय कुरखेडाचा नाव उज्वल केला आहे.
जिल्हा क्रीडा स्पर्धेत डॉजबॉल संघात १७ व १९ वर्षे वयोगटातील मुलांना जिल्हास्तरावर शासनाच्या वतीने जिल्हा युवक संचालन पुणे अंतर्गत प्रत्येक खेळाडू विद्यार्थ्यांना त्यांच्या जिल्ह्यावर जिंकलेल्या सर्व विद्यार्थ्यांना दहावी व बारावी बोर्डाच्या परीक्षेत प्रत्येकी ५ गुण याची भरीव वाढ व त्यांना या गुणाचं अति मूल्य प्राप्त झालेला आहे. श्रीराम विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय कुरखेडा या विद्यार्थ्यांनी आपल्या श्रीराम विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयाचे नाव उज्वल केला आहे.
या क्रीडा स्पर्धेमध्ये जिल्हा क्रीडा अधिकारी घटाळे सर, उईके सर राज्य क्रीडा मार्गदर्शक व तसेच श्रीराम विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय कुरखेडा येथील प्राचार्य नागेश्वर फाये ,तसेच क्रीडा शिक्षक ज्ञानेश्वर देशमुख प्राध्यापिका अपूर्वा बांबोडे, लिपिक आशिष परशुरामकर, परवेजजी पठाण, द्वारकाजी सहारे आणि तसेच क्रीडा स्वयंसेवक क्षितीज मेश्राम यांचा सहकार्य लाभला, यावेळी डान्सबार स्पर्धेमध्ये विजेता विद्यार्थ्यांचे आदिवासी ग्रामीण विकास शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष कोषाध्यक्ष सचिव व पदाधिकारी व शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांचा कौतुक करण्यात आले.

About The Author

error: Content is protected !!