आज कुरखेडा येथे श्रीराम उत्सव समितीच्या वतीने भव्य तान्हा पोळा महोत्सवाचे आयोजन

कुरखेडा, ३ सप्टेंबर : दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सुद्धा आज दिनांक ३ सप्टेबंर रोज मंगळवारला श्रीराम उत्सव समिती श्रीराम मंदिर श्रीराम नगर कुरखेडा यांच्या वतीने सार्वजनिक तान्हा पोळा महोत्सव तथा भव्य वेशभूषा व नंदीबैल सजावट स्पर्धा चे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेत विविध बक्षिसांची मेजवानी ठेवण्यात आली असून छत्रपती शिवाजी महाराज गट-अ वयोगट ८ ते १७ वर्षाकरिता गटाला प्रथम पुरस्कार १११११ रुपये द्वितीय पुरस्कार ७७७७ रुपये तृतीय पुरस्कार ४४४४ रुपये चतुर्थ पुरस्कार २२२२ रुपये व प्रोत्साहन ६ बक्षीस ११११ रुपये ठेवण्यात आले आहे.
तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर गड ब वयोमर्यादा १ ते ७ वर्षाकरिता या गटाकरिता प्रथम पुरस्कार ९९९९ रुपये द्वितीय पुरस्कार ६६६६ तृतीय पुरस्कार ३३३३ रुपये चतुर्थ पुरस्कार २२२२ रुपये व प्रोत्साहन पर बक्षीस ११११ रुपये ठेवण्यात आले असून या स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांना लकी ड्रॉ च्या माध्यमातून दोन्ही गटांना विविध भेटवस्तू मिळणार आहेत करिता श्रीराम उत्सव समितीच्या वतीने आयोजित सार्वजनिक तान्हा पोळा महोत्सव व भव्य नंदीबैल सजावट स्पर्धा मध्ये बालगोपालांनी मोठ्या संख्येत सहभागी व्हावे असे आव्हान श्रीराम उत्सव समिती कुरखेडा यांच्यावतीने करण्यात आले आहे.