शेकडो बालगोपालांनी नंदीबैल सजावट व वेशभूषा स्पर्धेत भाग घेवून तान्हा पोळा केला साजरा
1 min readकुरखेडा, सप्टेंबर ०५: २०१७ पासून सुरू झालेली तान्हा पोळा महोत्सवाची परंपरा कायम ठेवत श्रीराम उत्सव समिती कुरखेडा यांनी यावर्षी तान्हा पोळा चे औचित्य साधत बाल गोपालांसाठी लाखो रुपयांचे बक्षीस ठेवित भव्य नंदीबैल सजावट व वेशभूषा स्पर्धेचे आयोजन दिनांक ३ सप्टेबंर रोज मंगळवारला श्रीराम उत्सव समिती श्रीराम मंदिर श्रीराम नगर कुरखेडा यांच्या वतीने सार्वजनिक तान्हा पोळा महोत्सव तथा भव्य वेशभूषा व नंदीबैल सजावट स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत कुरखेडा तालुक्यातील व ग्रामीण भागातील शेकडो बालगोपालांनी आपला नंदीबैल सजावट करून व स्वतः वेशभूषा धारण करून स्पर्धेत मोठ्या संख्येत सहभाग घेऊन लाखो रुपयाची बक्षिसे प्राप्त केले तर स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या बालगोपालांना लकी ड्रा च्या माध्यमातून अनेक बक्षीसे मिळाले तर स्पर्धेमध्ये सहभाग झालेल्या प्रत्येक बालगोपालांना श्रीराम उत्सव समितीच्या वतीने भेटवस्तू देण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष विश्व हिंदू परिषद जिल्हा कार्याध्यक्ष वामनराव फाये विशेष अतिथी पद्मश्री डॉ. परशुराम खुणे, पोलीस निरीक्षक महेंद्र वाघ, संवर्ग विकास अधिकारी धीरज पाटील,शहर विचार मंच अध्यक्ष माधवराव निरंकारी,निरकांरी मिशनचे प्रमुख हरिश निरंकारी ,संस्था सचिव दोषहरराव फाये,माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक रवींद्र गोटेफोडे, भाजपा जेष्ठ नेते गणपत सोनकुसरे,अँड उमेश वालदे, पत्रकार संघटनेचे सचिव नशिर हाशमी, वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास धोडने,शिवा वडीकर, केशव मांडवे, मुरारी देशमुख, तुकाराम मुंगणकर रामहरी उगले विजय झंवर,गितेश्वर उईके दिनेश भट्टडानगरसेविका दुर्गाताई गोटेफोडे, आशाताई बानबले, सुधाताई नाकाडे,कल्पना मांडवे,कविता खडसे, जागृती झोडे,खेडीकर शिक्षिका, उपस्थित होते.
यावेळी परीक्षक म्हणून शिक्षक नरेश मांडवे, लालचंद धाबेकर,रजनी आरेकर, कवियत्री जोषना बनसोड,पायल सांगोळे ,निकिता खडसे यांनी परिक्षणाची जबाबदारी पार पाडली.
छत्रपती शिवाजी महाराज गट-अ वयोगट ८ ते १७ वर्षाकरिता गटाला प्रथम पुरस्कार १११११ रुपये द्वितीय पुरस्कार ७७७७ रुपये तृतीय पुरस्कार ४४४४ रुपये चतुर्थ पुरस्कार २२२२ रुपये व प्रोत्साहन ६ बक्षीस ११११ रुपये ठेवण्यात आले आहे.
तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर गड ब वयोमर्यादा १ ते ७ वर्षाकरिता या गटाकरिता प्रथम पुरस्कार ९९९९ रुपये द्वितीय पुरस्कार ६६६६ तृतीय पुरस्कार ३३३३ रुपये चतुर्थ पुरस्कार २२२२ रुपये व प्रोत्साहन पर बक्षीस ११११ रुपये ठेवण्यात आले होते. या स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांना लकी ड्रॉ च्या माध्यमातून दोन्ही गटांना विविध भेटवस्तू दिल्या गेले तर दोन्ही गटातील बारा स्पर्धकांना प्रोत्साहन पर ११११ रुपये बक्षीस देण्यात आले. श्रीराम उत्सव समितीच्या वतीने आयोजित सार्वजनिक तान्हा पोळा महोत्सव व भव्य नंदीबैल सजावट स्पर्धा मध्ये बालगोपालांनी मोठ्या संख्येत सहभागी होऊन विविध बक्षिस पटकावले.
यावेळी संस्कार पब्लिक स्कूल कुरखेडा येथील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीराम उत्सव समितीचे आयोजक भाजपा तालुका अध्यक्ष चांगदेव फाये यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रा. विनोद नागपूरकर यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी हुंडीराज फाये गुणवंत फाये , देवेंद्र फाये, नागेश्वर फाये, मनिष फाये ,श्रेयस फाये, हिरालाला चौधरी गणेश चौधरी उल्हास देशमुख, मंगेश मांडवे तुषार कुथे, राहुल गिरडकर ,अक्की सांगोळे, लक्ष्मण धूडसे, पुष्पराज रांहागडाले,राजु टैभुर्णैाप्रशांत हटवार, किशोर बनसोड, धिरज बांगरे शोयब पठाण मोहन बोदेले, स्वप्निल खोब्रागडे, दादु मेश्राम हरीश तेलका, अक्षय काळबांधे , पंकज हरडे, दिक्षित बनसोड मधुसुदन दखने श्रीराम उत्सव समिती येथील युवा वर्गांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केले. कार्यक्रमाला कुरखेडा येथिल नागरिक महिला युवा बालगोपाल मोठ्या संख्येने उपस्थित होते.