उप मुख्यमंत्री अजित पवार एक दिवसीय गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर
1 min readगडचिरोली,(जिमाका)दि.5: उप मुख्यमंत्री अजित पवार 06 सप्टेंबर 2024 रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून त्यांचे कार्यक्रमपुढीलप्रमाणे राहतील.
दिनांक 6 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता अहेरी येथे आगमन. सकाळी 11.15 वा. राजे धर्मवीर शाळा, रेड्डी कॉम्पलेक्स, अहेरी रोड, नागेपल्ली येथे रक्षाबंधन कार्यकम. सकाळी 11.45 वा. सावरकर चौक, आलापल्ली येथे आदिवासी बंधू–भगिनींमार्फत पारंपारिक नृत्य कार्यक्रमसादरीकरण कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 12 वा. वन विभागाचे मैदान, आलापल्ली येथे जनसन्मान यात्रा– शेतकरी व लाडक्या बहिणींशी संवाद. दुपारी 2.15 वा. राजवाडा निवासस्थान अहेरी येथे राखीव. दुपारी 3.20 वाजता नागपूरकडे प्रयाण.