October 22, 2026

Gadchiroli News Network

“The Voice of Gadchiroli. The Eyes on the World.”

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभीमान योजनेअंतर्गत जमीन विक्रीचे प्रस्ताव आमंत्रित

गडचिरोली, सप्टेंबर 10: कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभीमान योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांमधील दारीद्रयरेषेखालील भूमिहीन कुटुंबाना शासनामार्फत 4 एकर कोरडवाहू किंवा 2 एकर ओलिताखालील जमीन 100 टक्के अनूदानावर उपलब्ध करून द्यावयाची आहे. सदर जमीन शासनाने लाभार्थ्यांना खरेदी करून द्यावयाची आहे. त्याअनुषंगाने गडचिरोली जिल्हयातील ज्या शेतकऱ्यांना जमीन विकावयाची आहे त्यांनी विकत असलेल्या जमीनीचा 7/12,जमिनीचा नकाशा, धारण करीत असलेल्या जमीनीचा तपशील (नमुना 8-अ), जमीन मोजणी “क” प्रत, गाव नकाशा, रु. 100 च्या स्टँम्पपेपरवर शपथपत्र इत्यादी माहितीसह जमीन विक्रीबाबतचा प्रस्ताव सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण गडचिरोली यांचे कार्यालयास सादर करावा. जमीन खरेदीबाबत 14 ऑगस्ट 2018 च्या शासन निर्णयानुसार कार्यवाही करण्यात येईल.अधिकच्या माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, गडचिरोली यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा.

About The Author

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!