अनुकंपा समुपदेशनासाठी पूरग्रस्तांना मिळणार पुन्हा संधी – आयुषी सिंह
1 min readगडचिरोली दि. १०: गडचिरोली जिल्ह्यातील पूर परिस्थितीमुळे ज्या उमेदवारांना अनुकंपा पद भरतीच्या समुपदेशनासाठी आज उपस्थित राहणे शक्य होणार नाही फक्त त्यांनाच पुन्हा एकदा संधी देण्यात येवून त्यांचे समुपदेशन नंतर घेण्यात येणार आहे. इतर उपस्थित उमेदवारांची समुपदेशन प्रक्रिया आज पार पाडली जाईल व कुणाही अनुकंपाधारकाचे नुकसान होऊ दिले जाणार नाही. त्यामुळे कुणीही उमेदवाराने घाबरून जाऊ नये, असे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी कळविले आहे.