धमदीटोला ते कुरखेडा पुलाचे काम अपूर्ण: नागरिकांना करावालागतोय अडचणींचा सामना
1 min readकुरखेडा, २४ : धमदीटोला ते कुरखेडा दरम्यानच्या पुलाचे काम गेल्या एका वर्षापासून अपूर्ण स्थितीत असल्याने नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पावसाळ्याच्या काळात परिस्थिती आणखीनच बिकट झाली आहे. अपूर्ण पुलामुळे वाहतूक धोकादायक ठरली असून, नागरिकांना चिखलातून प्रवास करावा लागत आहे.
या समस्येमुळे आरोग्य सेवा देखील प्रभावित झाली आहे. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना योग्य वेळी दवाखान्यात पोहोचण्यात अडचणी येत आहेत. विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही याचा गंभीर परिणाम होत आहे, कारण शाळा-महाविद्यालयात पोहोचण्यास त्यांना अडथळे येत आहेत.
धमदीटोला आणि कुरखेडा परिसरातील लोकांनी ही समस्या जनसंवाद परिवर्तन यात्रेच्या दरम्यान काँग्रेसच्या डॉ. शिलू चिमूरकर यांच्यासमोर मांडली. डॉ. चिमूरकर यांनी या समस्येवर तातडीने संबंधित विभागांशी चर्चा करून पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे.