December 22, 2024

e-textile प्रणालीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनावरण

1 min read

*वस्त्रोद्योगाला चालना देऊन रोजगार निर्मितीवर भर द्यावा – मुख्यमंत्र्यांच्या सूचना*

मुंबई,दि.२४, वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी e-textile प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या e-textile प्रणालीचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे करण्यात आले. यावेळी वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक, श्री.विरेंद्र सिंह, सचिव, वस्त्रोद्योग, संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, राज्याचे नवीन एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण जाहीर केले आहे. या अंतर्गत लघु वस्त्रोद्योगाला चालना देऊन या माध्यमातून अधिक रोजगार निर्मिती करावी अशा सूचना यावेळी दिल्या.

वस्त्रोद्योग विभागाच्या विविध योजनांकरीता end to end Process Automation करण्यासाठी ही प्रणाली नव्याने तयार करण्यात आली आहे.
‘इज ऑफ डूइंग बिजनेस’ च्या माध्यमातून वस्त्रोद्योग विभागातील सर्व योजनांची माहिती एकत्रित उपलब्ध व्हावी आणि यामध्ये अधिक सुलभता यावी यासाठी आयसीआयसीआय बँकेमार्फत e-textile प्रणाली विकसित करण्यात आली आहे, अशी माहिती सचिव श्री.विरेंद्र सिंह यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून दिली.

About The Author

error: Content is protected !!