परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढली, धान्य पिके कोलमडल्याने उत्पादनावर परिणाम होण्याची भीती
1 min readकुरखेडा; सप्टेंबर २४ : कुरखेडा तालुक्यात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांनी लावनी केलेल्या हलक्या प्रजातीची धान्य कोलमडून पडून धान्य पिके जमीन दोस्त झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे प्रमाणात नुकसान झाले असून कुरखेडा तालुक्यातील शेतकरी बांधव आता पाऊस नको रे बाबा असे म्हणत आहेत.
परतीच्या पावसामुळे कुरखेडा तालुक्यातील चिखली ,कुंभिटोला येथील शेतकरी विजय डाहाळे, ईश्वरदास डाहाळे , गुलाबचंद पगडवार , महेश बसोना, दयाराम होळीकर श्रिराम नागपुरे , तारेंद्र डाहाळे विनोद डहाळे , पुंडलिक नागपूरकर,मनोहर झोडे, धनंजय तंलाडे, ह्या शेतकरी बांधवांचे हलक्या पर जातीचे धान्य पिके पडून पाण्याखाली सापडले आहेत त्यामुळे महसूल विभागाने वेळीच पंचनामे करून नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.