शहरातील दूकानातून ३ लाखाची रोकड लंपास करणा-या ३ विधीसंघर्षग्रस्त बालकासह एका आरोपीला अटक
1 min readकूरखेडा-, २८ नोव्हेंबर : (प्रतिनिधी) : शहरातील एका जनरल स्टोर मध्ये रात्री अवैध पणे प्रवेश करीत दूकानातील ३ लाखाची रोकड लंपास करणार्या दूकानात मदत करणार्या एका बालकासह अन्य तिन जणाना कूरखेडा पोलीसानी ताब्यात घेत चौकशी अंती त्यांचा कडून मूद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जनरल स्टोरचे संचालक साहील हिरालाल वरलानी यांनी कूरखेडा पोलीस स्टेशन येथे दोन दिवसापूर्वी तक्रार दाखल केली की त्यांचा शहरातील मूख्य मार्गावर असलेल्या दूकानात रात्री अद्यात आरोपीने प्रवेश करीत ३ लाखाची रोकड लंपास केली या तक्रारीवरून गून्हा दाखल करण्यात येत संशयावरून दूकानाचा कामात सहकार्य करणार्या एका विधीसंघर्षग्रस्त बालक याची चौकशी करण्यात येत त्याचा कबूली वरून त्याचे सहकारी पून्हा २ विधी संघर्षग्रस्त बालक व एक आरोपी नामे इब्राहिम इसराइल कूरेशी वय २० रा.कूरखेडा याना ताब्यात घेण्यात आले त्यानी गून्हाची कबूली देताच त्यांचाकडून चोरीला गेलेल्या रोख ३ लाख रकमेपैकी २ लाख ८८ हजार ६९९ रू. हस्तगत करण्यात आले व आरोपी विरोधात भारतीय न्याय संहिता २०२४ कलम ३३१(३)३३१(४)३०५(अ),३(५) अन्वये गून्हा दाखल करण्यात आला सदर प्रकरणाचा तपास जिल्हा पोलीस अधिक्षक निलोत्पल अप्पर पोलीस अधिक्षक एम रमेश उपविभागीय पोलीस अधिकारी रविन्द्र भोसले यांचा मार्गदर्शनात ठाणेदार महेन्द्र वाघ पोलीस उपनिरीक्षक वर्षा बोरसे पोलीस हवालदार शेखलाल मडावी, संदेश भैसारे यांचा चमूने केला