संस्कार पतसंस्थेने कुठलेही भ्रष्टाचार व आर्थिक अफरातफर केलेली नाही – अध्यक्ष मनीष दोषहर फाये
1 min read“संस्थेतील सर्व खातेधारक सर्व भागीदार यांनी संस्थेवर विश्वास ठेवून सहकार्य करावे”
गडचिरोली, २० डिसेंबर : संस्कार क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी मर्यादा गडचिरोली येथील चालकाच्या विरोधात सत्यबाबी लपवून कोर्टात दिशाभूल करून गुन्हे दाखल करून घेण्याचा कट कारस्थान वेद प्रकाश राठोड यांनी केला आहे.
कुरखेडा पोलीस स्टेशन येथे दिनांक 19-12-2024 रोजी दाखल झालेली प्रथम खबर क्रमांक 0255 नुसार संस्कार क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी मर्या गडचिरोली मुख्यालय कुरखेडा या संस्थेच्या भागीधारक असल्याचा राठोड यांनी दावा खोटा असून ज्या चार खातेधारकाचे नाव वापरून संस्थेच्या विरोधात आर्थिक गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवला आहे. त्याच्या विरोधात प्रकरण न्यायप्रविष्ठ असून या संदर्भात शुभम राजकुमार परिहार व मुनेश पारधी यांना जामीनावर सोडले असून प्रकरणाचा तपास दरम्यान तीन महिन्याचा तुरुंगवास झालेला होता. संस्थेमध्ये काम करत असताना कर्ज उचल करून त्यासाठी लागणारे सर्व दस्तावेज संस्थेकडे जमा केले आहे त्यामध्ये संस्थेच्या नियमा प्रमाणे 100 रुपयाच्या स्टॅम्पवर करारनामा केलेला आहे आणि ही बाब यांच्यावर दाखल असलेल्या प्रकरणात पोलिसांनी तपास करून चौकशी अहवाल सुद्धा सादर केला आहे. जो प्रकरण न्यायप्रविष्ठ असून त्यांच्या आधारावर हेतू पुरस्पर सत्यबाबी लपवून न्यायालयाची दिशाभूल करून प्रकरण दाखल केले गेले आहे. न्यायालयात दाखल प्रकरणात पोलीस आमचे प्रकरण ऐकत नाही असे सहानुभूती मिळविण्यासाठी सुनियोजित कट रचलेले आहे. वास्तविक ज्या चार लोकांच्या खात्यांचा आधार घेऊन आरोप केले आहे , त्या चारही लोक संस्थेशी संबंधित होते . ज्यांनी त्यांना मिळालेल्या अधिकाराचा दुरुपयोग करून पतसंस्थेत आर्थिक अफरातफर केली आहे. त्याबाबत त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल आहे.
सदर प्रकरण तपासाअंती पोलिसांनी सादर केलेल्या अहवालात असे नमूद केले आहे की सदर चारही लोकांनी आपसी संगमत करून पतसंस्थेतील मर्यादा पेक्षा जास्त कर्ज वाटप संबंधी नियमाचे व कर्ज उपविधीचे उल्लंघन करून कर्ज मंजूर करून घेतल्या व पतसंस्थेच्या विरोधात तथ्यहीन आरोप केले आहेत.
सदर प्रकरणात कुरखेडा पोलीसांनी चौकशी करून पुढील प्रमाणे निष्कर्ष काढले आहेत.
शुभम रामकुमारसिंग परीहार व अर्जदार प्रभावती रामकुमारसिंग परीहार यांचे कर्ज दि. १६/०९/२०२२ रोजीच्या पतसंस्थेच्या संचालक मंडळाने घेतलेल्या उरावामध्ये मंजूर झाले आहे, दि. २२/०९/२०२२ ते दि. ०६/१०/२०२३ रोजीपावेतो कर्ज दोघांना पतसंस्थेतून वाटप करण्यात आले आहे, दोषांच्या विहॉल स्लिपवरून पतसंस्थेतून उचल केल्याचे दिसून येत आहे.
सदर अर्जदार प्रभावती रामकुमारसिंग परीहार ही दैनिक अभिकर्ता असल्यामुळे तिला दर महिन्याचे अकाउंट स्टेटमेंट माहित असते, तसेच शुभम रामकुमारसिंग परीहार हा व्यवस्थापक विस्तार कक्ष कोरची येथील असल्यामुळे त्यास अकाउंट स्टेटमेंट माहित असते, तरीसुध्दा जवळपास एक वर्षानंतर सदर अर्जदार प्रभावती परीहार यांनी कर्जप्रकरणात संस्थेविरुद्ध तकार दिली
सदर अर्जदार यांना कर्ज जमा व विड्रॉल बाबत माहिती असून, तरीसुध्दा पतसंस्थेने चौकशी समिती नेमण्यापूर्वी अर्जदार किंवा इतर अर्जदारांनी त्यावर हरकत घेतली नाही किंवा तक्रार अर्ज दिला नाही.
शुभम रामकुमारसिंग परीहार याने स्वतः प्रस्ताव स्वतः तयार केला असून तेव्हा तो विस्तार कक्ष कोरची येथे व्यवस्थापक पदावर कार्यरत होता, तसेच त्याने त्याच्या आईचा अर्जदाराचा प्रस्ताव स्वतः तयार करून मुख्य शाखा कुरखेडा येथील पतसंस्थेच्या शाखेत स्वतः दाखल केला आहे.
शुभम परीहार व प्रभावती परीहार यांच्या तर्फे सौरभ परीहार याने स्टॅम्प पेपर वेंडरकडून बैंक कर्ज प्रकरणाकरीता विकत घेउन नमूद अर्जदार प्रभावती व शुभम परीहार याने कर्ज प्रस्तावात सादर केलेले आहेत.
दि. १७/०८/२०२३ रोजी मध्ये खातेदाराच्या पैशाची अफरातफर, अपहार व फसवणूक प्रकरणी पतसंस्थेचे अध्यक्ष मनिष फाये यांच्या अध्यक्षेतखाली एक उपसमिती पतसंस्थेने नेमली होती त्यानंतर खातेदाराच्या पैशांची अफरातफर, अपहार व फसवणूक प्रकरणी दि. २५/०९/२०२३ रोजी अर्जदार प्रभावती रामकुमारसिंग परीहार व तिचा मोठा मुलगा शुभम रामकुमारसिंग परीहार मुनेश्वर उमाजी पारधी व लोमेश उमाजी पारधी यांचेविरूध्द पतसंस्थेचे अध्यक्ष मनीष फाये यांनी तकार दिल्याने पो स्टे कोरची येथे अप क्र. १७/२३ कलम ४०९, ४२०, ५०१, ३४ भादवि अन्वये गुन्हा दाखल केला होता. पतसंस्थेने उपसमिती नेमल्यानंतर नमूद अर्जदार प्रभावती व ईत्तर अर्जदार यांनी पो स्टे कुरखेडा येथे तकार अर्ज दिला आहे
शुभम रामकुमारसिंग परीहार याची टर्म इन्शुरन्स पॉलीसी क्र ९३७४२१४३७ ही खरी आहे किंवा कसे याचाबत एल आय सी मुख्य कार्यालय गडचिरोली येथे पत्र देउन अभिप्राय घेतला असता सदरची पॉलीसी खरी असल्याचे पत्र एल आय सी गडचिरोली यांनी दिले आहे तसेच एजंट क्र ०३६२२९७ सी असा असून एजंट चे नाव धिरज चक्रधर बागरे असल्याचे लेखी दिले आहे. सदरतु टर्म इन्शुरन्स पॉलीसी वर नॉमिनी म्हणून संस्कार केडीट को ऑपरेटीव्ह सोसायटी मर्यादित गडचिरोली शाखा कुरखेडा चे नाव आहे.
अर्जदार प्रभावती परीहार यांचा लहान मुलगा तसेच अर्जदार वेदप्रकाश राठोड यांचा लहान साळा सौरभ रामकुमारसिंग परीहार याने १००/- रू ने एकूण ८ स्टॅम्प वेंडर श्री देवीपालसिंह शिवचरणसिंह चौहान यांचेकडून शुभम परीहार व प्रभावती परीहार तर्फे बँक कर्जाकरीता दि. २७/०९/२०२२ रोजी विकत घेतले होते, त्या स्टॅम्प विकी रजिस्टरवर असलेली सौरभ परीहार याची सही व दि. १५/०३/२०२४ रोजी गा जिल्हाधिकारी सो, कार्यालय गडचिरोली येथून मा पोलीस अधिक्षक कार्यालय येथे प्राप्त अर्ज यावर अर्जदार सौरभ रामकुमारसिंग परोहार याने दिलेल्या तकार अर्जावर सही व १००/-रू च्या स्टॅम्पवर असलेल्या सहया सारख्या दिसत आहे. सौरभ परीहार याने जाणीवपूर्वक पो स्टे कुरखेडा येथे दिलेल्या बयानावर व समजपत्रावर वेगळी सही केली असून सौरभ परीहार हा दोन प्रकारच्या सहया करती है चौकशीत निष्पन्न झाले आहे.
वेद प्रकाश राठोड हे परिहार परिवारातील नातेसंबंध हितसंबंध जोपासणारे असून त्यांचे सख्खे नातेवाईक आहेत. संपूर्ण आरोप हे तथ्यहीन व निराधार आहेत. त्यांच्या नुसार संस्थेने कुठलेही कागद पत्र पुर्तता नकरता कर्ज दिलेले हे आरोप चुकीचे आहे.
संस्थेने या संदर्भात कर्जाला लागणारे कागदपत्राची पूर्तता नियमाप्रमाणे केलेली आहे. कर्जपोटी संस्थेत एलआयसी पॉलिसी गहाण असून त्यावर नियमाप्रमाणे बोजा बाबत नोंद चढवलेला आहे. तरी संस्था व गैर अर्जदार विरोधात प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना त्याच प्रकरणात परत नव्याने नवीन अर्जदार बनून न्यायालयाची दिशाभूल करून संस्थेची नाहक बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे.
यासंदर्भात होणाऱ्या संपूर्ण चौकशी संस्था पोलिसांना सहकार्य करण्यास तयार असून संस्थेने कुठलेही भ्रष्टाचार व आर्थिक अपरातफर केलेली नाही. तरी संस्थेतील सर्व खातेधारक सर्व भागीदारात यांनी संस्थेवर विश्वास ठेवून सहकार्य करावे असे आव्हान संस्था अध्यक्ष मनीष दोषहर फाये यांनी केले आहे.