December 23, 2024

शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे डीप्राटोला येथे उद्घाटन

1 min read

कुरखेडा, २३ डिसेंबर: शिक्षण उपसंचालक नागपूर विभाग नागपूर तथा श्री.शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ गडचिरोली व्दारा संचालित शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय कुरखेडा येथील राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे उद्घाटन आज दिनांक २३/१२/२०२४ रोज सोमवारला जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणावर डीप्राटोला येथे पार पडला .
राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे उद्घाटक म्हणून कुरखेडा तहसीलचे नायब तहसीलदार राजकुमार धनबाते हे उपस्थित होते . उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्ष शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय कुरखेडा प्राचार्य डॉ.अविनाश गौरकार हे उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून कुरखेडा पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक महेंद्र वाघ , नान्ही ग्रामपंचायत चे सरपंच चंद्रभान हुंडरा , जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापिका एम.बी.शेडमाके , नान्ही ग्रामपंचायत चे उपसरपंच रुपचंद कापगते , स्वर्णदीप कनिष्ठ महाविद्यालय कुरखेडा चे प्राध्यापक संतोष मेश्राम , मंडळ अधिकारी खरकाटे , राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे कार्यक्रम अधिकारी विजय मेश्राम , विद्यार्थी शिबीर प्रमुख मयूर गेडाम , विद्यार्थिनी शिबीर प्रमुख उर्वशी सहारे हे उपस्थित होते .
राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने यावर्षी डीप्राटोला या गावची निवड २०२४ – २५ या शैक्षणिक वर्षासाठी करण्यात आलेली आहे . या शिबिरादरम्यान ग्रामसाठी युवक , स्वच्छ भारत अभियान , माझी वसुंधरा अभियान , आपत्ती व्यवस्थापन शोषखड्डा निर्मिती जलसंवर्धन जनजागृती , पायवाट नूतनीकरणासारख्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे .
*सदर राष्ट्रीय सेवा योजना उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख अतिथी पोलीस निरीक्षक महेंद्र वाघ यांनी शिबिरार्थ्यांना आपल्या विद्यार्थी जीवनातून स्वत:च्या आई – वडील यांच्याकरिता , गुरुजन , स्वत:च्या गावाकरिता , स्वत:च्या जिल्ह्याच्या विकासाकरिता काय करू शकता या विषयी व वैयक्तिक आणि शिबिरासाठी व्यावहारिक उपाय शोधण्यासाठी त्यांच्या ज्ञानाचा उपयोग करा आपल्या मार्ग्दर्शांनातून म्हटले .*
*राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे उद्घाटक म्हणून कुरखेडा तहसीलचे नायब तहसीलदार राजकुमार धनबाते यांनी आपल्या मार्गदर्शनातून शिबिरार्थ्यांना तथा डीप्राटोला वासियांना राष्ट्रीय सेवा योजना शिबिर ( ग्रामसाठी युवक ) कशारीतीने यशस्वी पार पाडता येईल या विषयी व शिबिरार्थ्यांना आपापसात सामाजिक आणि नागरी जबाबदारीची भावना विकसित करावी या बद्दल मार्गदर्शन केले .*
*राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य डॉ.अविनाश गौरकार यांनी आपल्या मार्गदर्शनातून कॅम्पस आणि समुदाय यांच्यात अर्थपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना सुरू करण्यात आली . जोपर्यंत विद्यार्थी तरुणांना गावे / समाजाच्या उन्नतीसाठी कार्य करण्यास प्रवृत्त होत नाही तोपर्यंत देश अपेक्षित दिशेने प्रगती करू शकत नाही . राष्ट्रीय पुनर्रचना आणि राष्ट्रीय पुनरुत्थानासाठी शिबिरार्थी हे योग्यरित्या संवेदनशील बनले पाहिजे आणि ग्रामीण समुदायावर विशेष भर देऊन संपूर्ण भारतीय समाज मजबूत करण्यासाठी वापरला गेला पाहिजे असे व्यक्त केले*
सदर उद्घाटन सोहळ्याचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना चे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक विजय मेश्राम व सूत्रसंचालन प्राध्यापक मनोज सराटे यांनी केले तर आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजना चे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक स्वप्नील खेवले यांनी केले .
उद्घाटन सोहळा यशस्वी पार पाडण्याकरीता विद्यालयातील प्राध्यापक कालिदास सोरते , रुपेश भोयर , गुरुदास शेंडे , मुनेश्वर राऊत , विवेक गलबले , आलाम व शिक्षकेत्तर कर्मचारी शिवा भोयर , अक्षय देशमुख , राष्ट्रीय सेवा योजना चे शिबिरार्थी तथा समस्त डीप्राटोला वासियांनी सहकार्य केले .

About The Author

error: Content is protected !!