प्रशासन गाव की ओर’ या उपक्रमांअतर्गत चामोर्शी तालुक्यात ‘राष्ट्रीय कुटुंब योजनेचे’ अनुदान वितरित
1 min readगडचिरोली, २३ डिसेंबर: केंन्द्र शासन व महाराष्ट्र शासन अंर्तगत “प्रशासन गाव की ओर” या उपक्रमांअतर्गत, मौजा चामोर्शी येथे, तहसीलदार प्रशांत घोरुडे यांचे अध्यक्षतेखाली तालुक्यामधील द्रारिद्रयरेषेखालील पात्र असलेल्या एकुण 67 लाभार्थी / कुटूंबांना, राष्ट्रीय कुटुंब योजनेअंतर्गत एक रकमी रुपये 20 हजार प्रमाणे एकुण तेरा लाख चाळीस हजार अनुदान वितरीत करण्यांत आले. राष्ट्रीय कुटुंब योजनेअंतर्गत द्रारिद्रयरेखेखालील कुटूंबातील कर्ता पुरुष मृत्यु पावल्यामुळे, केंन्द्र व राज्य शासनातर्फे प्रती कुटुबांस एक रकमी रुपये 20 हजार अनुदान दिले जाते. त्यानुसार
“प्रशासन गाव की और” या उपक्रमांअतर्गत नायब तहसिलदार (संगायो) गिरीश नरोटे यांनी केंद्र व राज्य शासनाच्या विविध अनुदानाबाबत माहिती देऊन, प्रस्तावना सादर केली. तर तहसिलदार प्रशांत घोरुडे यांनी लाभार्थींना प्रमाणपत्राचे वाटप व मार्गदर्शन केले. तसेच तलाठी कार्यालय निहाय राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी याची यादी प्रसिध्द करण्यांत येत असुन, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या सर्व लाभार्थी यांनी, तलाठी कार्यालयात आपले नाव मंजुर यादीमध्ये समावेश आहे अथवा नाही, याची खात्री करण्याचे आवाहन केले.
यावेळी राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्याना प्रमाणपत्र व ऑनलाइन अनुदान वाटप करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यास श्रीमती जयश्री मडावी, महसुल अधिकारी व आनंद वाढई यांनी सहकार्य केले.