December 22, 2024

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभीमान योजनेअंतर्गत जमीन विक्रीचे प्रस्ताव सादर करण्याबाबत

1 min read

गडचिरोली,(जिमाका)दि.23: कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभीमान योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांमधील दारीद्रयरेषेखालील भूमिहीन कुटुंबाना शासनामार्फत 4 एकर कोरडवाहू किंवा 2 एकर ओलिताखालील जमीन 100 टक्के अनुदानावर उपलब्ध करुन द्यायची आहे.
सदर जमीन शासनाने लाभार्थ्यांना खरेदी करुन द्यावयाची आहे. त्याअनुषंगाने गडचिरोली जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांना जमीन विकावयाची आहे त्यांनी विकत असलेल्या जमीनीचा 7/12, जमिनीचा नकाशा,धारण करीत असलेल्या जमीनीचा तपशील (नमुना 8- अ),जमीन मोजणी “क” प्रत,गाव नकाशा, रु. 100 च्या स्टँम्पपेपरवर शपथपत्र इत्यादी माहितीसह जमीन विक्रीबाबतचा प्रस्ताव सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण,गडचिरोली यांचे कार्यालयास सादर करावा. शासन निर्णय दि.14 ऑगस्ट 2018 नूसार जमीन खरेदीबाबतची कार्यवाही करण्यात येईल.अधिकच्या माहितीसाठी सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण,गडचिरोली यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा असे सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण,गडचिरोली यांनी कळविले आहे.

About The Author

error: Content is protected !!