महागाव येथे टी बी उच्चाटनसाठी जन जागृती रॅली

अहेरी, ११ जानेवारी: टी बी म्हणजेच क्षय रोगाच्या उच्चाटनासाठी १०० दिवस टी बी कार्यक्रम अंतर्गत महागाव प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येथे क्षयरोगाबाबत जनजागृती साठी भव्य रॅली काढण्यात आली.
टी बी प्रतिबंध,लवकर तपासणी,उपचार, समुपदेशन करून नागरिकांना या रोगाबद्दल माहिती देण्यात आली.तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
या वेळी महागाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ लुबना हकीम, प्राथमिक आरोग्य केंद्र च्या एएनएम गोगे,आरोग्य उपकेंद्राच्या ए एन एम सिंग,आशा वर्कर जिजा सडमेक,चालक दिनेश अलोणे तथा जिल्हा परिषद शाळा महागाव चे मुख्याध्यापक आत्राम तथा शिक्षक उपस्थित झाले होते.
रॅली ही संपूर्ण गावात काढण्यात आली आणि रस्त्यावरील घरोघरी माहिती देण्यात आली.
टी बी विषयी भीती न बाळगता त्याच्याबद्दल पूर्ण माहिती असली पाहिजे कारण योग्य औषध उपचार आणि चांगला आहार,योग्य काळजी याने टी बी आजार बरा होऊ शकतो.आणि रोग्याने कोणती खबरदारी घेतली तर तो इतरांना होणार नाही याबाबत डॉ लूबना हकीम यांनी विद्यार्थी तथा इतरांना मार्गदर्शन केले.