January 15, 2025

मुनघाटे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी रक्तदानाने साजरी केली गो. ना .मुनघाटे यांची जयंती

1 min read

कुरखेडा, १२ जानेवारी: दंडकारण्य शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्था गडचिरोली द्वारा संचालित स्थानिक श्री गोविदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागद्वारे दंडकारण्य शैक्षणिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रद्धेय गोविंदराव मुनघाटे साहेब यांच्या जयंतीनिमित्त प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य रक्तदान , रक्तगट व हिमोग्लोबिन तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.
याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ .अभय साळुंखे, उपप्राचार्य पी.एस. खोपे, जिल्हा रुग्णालय गडचिरोली येथील रक्त संक्रमण अधिकारी डॉ. मुकुंद ढबाले, जिल्हा सामान्य रुग्णालयातील तंत्र सहाय्यक अजय ठाकरे ,सहाय्यक राहुल वाडके , सहाय्यक प्रमोद देशमुख ,बंडू कुंभारे, राजकुमार भगत, धीरज खेवले, उपजिल्हा रुग्णालय कुरखेडा येथील डॉ. जगदीश बोरकर, गोंडवांना विद्यापीठ रा. से .यो. सल्लागार समितीचे सदस्य डॉ. संजय महाजन, उपजिल्हा रुग्णालय कुरखेडा येथील सपना तुरुकमाने ,कल्पना भट ,निखिल फटिंग, दीक्षा जोगे राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख डॉ. संदीप निवडूंगे,रासेयो सहाय्यक डॉ. रवींद्र विखार, सहाय्यक डॉ. परमेश दानी, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. हेमंत मेश्राम, सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी इत्यादींच्या उपस्थित संपन्न झाले .
जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोलीचे रक्त संकलन सहाय्यक प्रमोदजी देशमुख अव्याहतपणे सेवा देत असल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी अजय ठाकरे यांनी रक्तदानाची आवश्यकता ,भारतात रक्तदानाचे प्रमाण ,रक्तदान कोण करू शकते, रक्तदान करताना घ्यायची खबरदारी, रक्तदानानंतर घ्यायची खबरदारी, रक्त दिल्यानंतर होणारी प्रक्रिया, इत्यादीवर विस्तृत माहिती दिली. तसेच डॉ.जगदीश बोरकर यांनी दरवर्षी गोविंदराव मुनघाटे साहेबांच्या जयंतीनिमित्त रक्तदान , रक्तगट तपासणी व हिमोग्लोबिन शिबिर आयोजित केल्या जात असल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे साहेब ,राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी, सर्व प्राध्यापक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करीत हे महाविद्यालय सामाजिक बांधिलकी सोबतच राष्ट्रीय कर्तव्य पार पाळीत असते याची मला सार्थ अभिमान असून रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे यावरही त्यांनी मार्मिक विवेचन केले.
यावेळी महाविद्यालयातील प्रा. डॉ.संदीप निवडंगे ,डॉ.हेमंत मेश्राम, टोकेश कोल्हे ,सुमित नैताम ,शुभम नाकाडे ,माजी विद्यार्थी विनीत काचीनवार ,केशर साखरे ,संस्कार झोडे ,लोकेश ठाकरे, काईनात कादरी, साहिल सयाम , इत्यादीचे विद्यार्थ्यांनी रक्तदान करून सामाजिक कर्तव्य सोबत राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले . या रक्तदान शिबिरात आजी व माजी विद्यार्थ्यांनी रक्तदान केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रा .से. यो .प्रमुख डॉ. संदीप निवडूंगे ,संचालन डॉ.रवींद्र विखार तर उपस्थित त्यांचे आभार डॉ.प्रमेश दानी यांनी मानले.
सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रा.हेमलता उराडे ,डॉ.दीपक बनसोड, डॉ. अमित रामटेके , डॉ.राखी शंभरकर, डॉ. निकेश लोखंडे, प्रा. तृप्ता वाकडे , प्रा.तिरुपती बोरकर ,प्रा. शैलेश हडप डॉ.कौस्तुभ राऊत, लोमनाथ गोनाडे, राजेंद्र गुडेकर, उषाबाई गजभिये ,विद्यार्थी प्रतिनिधी राकेश उईके ,रासेयो विद्यार्थी प्रतिनिधी श्रेयश टेंभुर्णे, लोचन झोडे ,सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी ,रा .से. यो .स्वयंसेवक, इत्यादींनी मोलाचे सहकार्य केले.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!