कुरखेडा येथील रक्तदान शिबिरात ५१ रक्तदात्यांनी रक्तदान करून जोपासली सामाजिक बांधिलकी
1 min read“स्वामी नरेंद्रचार्य महाराज भक्त मंडळ कुरखेडा यांचा पुढाकार”
कुरखेडा, १३ जानेवारी : तुम्ही जगा दुसऱ्याला जगू द्या असे संदेश देणारे जगद्गुरू श्री स्वामी नरेन्द्राचार्यजी महाराज रामानंदाचार्य दक्षिण पिठ नाणीज धाम रत्नागिरी यांचे भक्तसेवा मंडळ गडचिरोली तालुका सेवा समिती कुरखेडा यांचे वतीने उपजिल्हा रुग्णालय कुरखेडा येथे आयोजित महा रक्तदान शिबिरात नरेंद्रचार्य महाराज संप्रदायातील 51 भक्तांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
सदर रक्तदानातुन परीसरातील अपघातग्रस्त,सिकलसेल, डिलीव्हरी पेशंट व अन्य गरजु रुग्णांना वेळेवर रक्तपुरवठा करतात येणार आहे या करीता राज्य शासन,व जगद्गुरू नरेन्द्राचार्यजी महाराज यांचे भक्तसेवा मंडळाचे वतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.आहे.
या रक्तदान शिबिराप्रसंगी तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका अध्यक्ष आशिष काळे, नगराध्यक्ष, दिनू भाऊ वघारे, डॉक्टर जगदीश बोरकर, बंडूभाऊ गुरुकुले डॉक्टर मुकुंद ढबाले, डॉक्टर अजय ठाकरे, राहुल वाडके, प्रमोद देशमुख बंडू कुमारे उपजिल्हा रुग्णालय कुरखेडा येथील वैद्यकीय टीम उपस्थित होते. रक्तदान शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी नरेंद्रचार्य महाराज सेवा मंडळ कुरखेडा येथील भक्तांनी सहकार्य केले.