April 26, 2025

आरोग्य विभागातील उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रजासत्ताक दिनी गौरव

गडचिरोली दि.२६ : गडचिरोली जिल्हा हा अतिदुर्गम व जंगलव्याप्त आहे जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती पाहता अती दुर्गम भागात आरोग्य सेवा देत असताना अडी अडचणींना तोंड द्यावे लागते या सगळ्या गोष्टीवर मात करून मुख्यालयी राहून आरोग्य सेवा देणारे तसेच आरोग्य कार्यक्रम प्रभावीपणे राबवणारे अधिकारी व कर्मचारी यांना प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून राज्याचे वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधि व न्याय, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री मा ॲड. आशिष जयस्वाल यांच्या हस्ते गौरवण्यात आले.

यामध्ये मा.सह पालक मंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्या हस्ते डॉक्टर दुर्गा जराते वैद्यकीय अधिकारी प्रा आ केंद्र जीमलगट्टा, श्रीमती छाया तोडासे आरोग्य सेविका प्रा. आ. केंद्र मानेवारा ,श्री डोमा वणकर आरोग्य सेवक प्रा आ केंद्र लाहेरी,श्री सुनील चापले सांखिकि अन्वेषण जिल्हा परिषद, श्रीमती संगीता पुनगाटी आशा स्वयंसेविका प्रा आ केंद्र आरेवाडा गौरविण्यात आले.याप्रसंगी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, खासदार डॉ. नामदेव किरसान, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, जिल्हा पोलिस अधिक्षक श्री निलोत्पल, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ प्रताप शिंदे आदि प्रामुख्याने उपस्थित होते.
तसेच जिल्हा परिषद गडचिरोली येथे जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार यांच्या हस्ते आरोग्य विभागातील
डॉक्टर पवनकुमार राहेरकर प्रा केंद्र गट्टा , कु. अश्विनी मेंढे जिल्हा कार्यक्रम समन्वयक,श्री चंदू वाघाडे जिल्हा कार्यक्रम सहायक यांना गौरविण्यात आले.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!