७ फेब्रुवारी ला कुरखेडा येथे जिल्हास्तरीय पशु प्रदर्शनी

“पशु पालकांनी जिल्हास्तरीय प्रदर्शनीचा लाभ घ्यावा गट विकास अधिकारी तथा पशुधन विकास अधिकारी यांचे आव्हान”
कुरखेडा,५ फेब्रुवारी : पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद गडचिरोली पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती कुरखेडा द्वारा आयोजित जिल्हास्तरीय पशु प्रदर्शनी दिनांक ७/०२/२०२५ रोज शुक्रवारला सकाळी ०८ ते ०४ वाजेपर्यंत कुरखेडा पंचायत समितीच्या बाजूला गट साधन केंद्राच्या प्रांगणात भव्य जिल्हास्तरीय पशु प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले असून जिल्ह्यातील पशु पालकांनी पशु प्रदर्शनी मध्ये पशु आणून निशुल्क नोंदणी करावे असे आवाहन गट विकास अधिकारी धीरज पाटील तथा पशुधन अधिकारी यांनी केले आहे.
या प्रदर्शनीमध्ये सकाळी ०८ ते ११ पशूची नोंदणी होणार असून सकाळी ११ ते दुपारी १२ वाजेपर्यंत उत्कृष्ट पशुची निवड व मार्गदर्शन लाभणार आहे . दुपारी १२ वाजता पशुप्रदर्शनचे उद्घाटन व बक्षीस वितरण होणार आहे. नोंदणी केलेल्या संपूर्ण जनावरांना प्रोत्साहन पर बक्षीस दिल्या जाणार असून विशेष आकर्षक बक्षीस सुद्धा ठेवण्यात आलेले आहे त्यामुळे जिल्ह्यातील पशुपालकांनी या प्रदर्शनीचा लाभ घ्यावा असे आव्हान आयोजक समितीच्या वतीने करण्यात आले आहे.