मराठी भाषेचे जतन व संवर्धन करणे हे प्रत्येकाची जवाबदारी – न्यायमूर्ती एन.पी. देशपांडे यांचे प्रतिपादन

“दिवाणी व फौजदारी न्यायालय कुरखेडा येथे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा”
कुरखेडा, ५ फेब्रुवारी : राजभाषा असलेल्या मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त व्हावा याकरिता मराठी संस्कृतीचे सत्व जोपासणाऱ्या मराठी माणसानी मराठी भाषेतून एकमेकांशी संवाद साधून मराठी भाषेचे जतन व संवर्धन करून मराठी भाषेचे महत्व पटवून दिले पाहिजे सोबतच न्यायालयीन प्रक्रियेमध्ये मराठी भाषेचा उपयोग सुद्धा जास्तीत जास्त प्रमाणात झाला पाहिजे असे प्रतिपादन न्यायमूर्ती एन.पी देशपांडे यांनी केले ते दिवाणी व फौजदारी न्यायालय कुरखेडा येथे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थाना वरून बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर प्रमुख वक्ते म्हणून मराठी विषयाचे प्रा. विनोद नागपूरकर अँड.नाकाडे उपस्थित होते.
यावेळी प्रा. विनोद नागपूरकर यांनी मार्गदर्शन करताना म्हंटले की,मराठी माणूस आज आपल्याच मातृभाषेपासून दुरावत जात असून भाषेच्या शुद्धतेला आपण पारखे होत आहोत एकीकडे इंग्रजी सारख्या भाषेचा द्वेश तर करायचं नाही किंबहुना त्याचे ज्ञानही मिळवायचे हे आवाहन आहेत सोबतच आपली मराठी भाषा समृद्ध करायची तिचा वापर प्रसार व प्रचार करायचा आणि तिचे अस्तित्व अबाधित राखावे हे सुद्धा मोठे आव्हान आज मराठी माणसासमोर असल्याचे प्रतिपादन मराठी विषयाचे प्राध्यापक विनोद नागपुरकर यांनी व्यक्त केले.
यावेळी एडवोकेट नाकाडे त्याने सुद्धा मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अँड. नाकाडे यांनी केले तर आभार गोकुल नागमोती यांनी मानले. यावेळी कुरखेडा दिवाणी व फौजदारी न्यायालयातील वकील वर्ग व कर्मचारी बांधव उपस्थित होते.