April 27, 2025

“राज्यस्तरीय शालेय बॉल बॅडमिंटन व टेनिक्वाईट क्रीडा स्पर्धेचे उदघाटन थाटात संपन्न”

गडचिरोली,५ फेब्रुवारी: महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, म.रा.पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडापरिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने दि. 04 ते 06 फेब्रुवारी 2025 या कालावधीत राज्यस्तरीय शालेय बॉलबॅडमिंटन (19 वर्षाखालील मुले व मुली) व टेनिक्वाईट (14/17/19 वर्षाखालील मुले व मुली) या स्पर्धांचे आयोजन शासकीय विज्ञान महाविद्यालय, चामोर्शी रोड, गडचिरोली येथे आयोजीत करण्यात आले असून सदर स्पर्धेचा उद्धाटन सोहळा दि. 04 फेबुवारी 2025 रोजी सायंकाळी 05.00 वाजता शासकीय विज्ञान महाविद्यालय, गडचिरोली च्या प्रांगणात संपन्न झाला.
उद्धाटना प्रसंगी उद्घाटक म्हणुन राजेंद्र भांडारकर, शिवछत्रपती पुरस्कारार्थी हे उपस्थित होते तर अध्यक्ष म्हणून डॉ. प्रशांत जाखी, प्राचार्य, शासकीय विज्ञान महाविद्यालय, गडचिरोली हे उपस्थित होते. मंच्यावर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. रुपाली पापडकर, कार्यकारी सदस्य, भारतीय बॉल बॅडमिंटन महासंघ परेश देखमुख, शरदजी वाभळे, राजेश्वरजी बंगर, ॲड. मृणाल बांडेबुचे, ऋषीकांत पापडकर, अशोक ठोकळ इत्यादी क्रीडा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच महाराष्ट्र राज्यातील आठ ही विभागातील खेळाडू स्पर्धा आयोजनामध्ये सहभागी झाले.
स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांचे हस्ते स्व. खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेला माल्यार्पन करुन सुरुवात करण्यात आली असून प्रमुख अतिथींच्या हस्ते ध्वजारोहन करुन मार्च-पास करुन प्रमुख अतिथींनी मानवंदना स्विकारली. उद्धाटक राजेंद्र भांडारकर यांनी आपल्या भाषणातून खेळाडूंना मार्गदर्शकन करुन आयोजीत खेळाचे महत्व पटवून दिले व भविष्यात खेळामध्ये सहभागी झाल्याने त्याचा लाभ कसा होईल याबाबत सुद्धा मार्गदर्शन केले. डॉ. प्रशांत जाखी, प्राचार्य, शा.वि. महा. गडचिरोली यांनी आपल्या अध्यक्षीय भाषानातून खेळाडूंनी जास्तीत जास्त शारीरिक मेहनत करुन आपल्या क्रीडा प्रकारात हेरागीरीने कला कौशल्य दाखवून उत्तम कामगीरी करण्याबाबत शुभेच्छा देऊन आपल्या जिल्ह्याचा, राज्याचा नाव लौकिक करावे. असे सांगीतले. जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणातून राज्यस्तरीय स्पर्धेकरीता खेळाडूंसाठी केलेल्या सुविधांची माहिती देऊन स्पर्धेची सर्वसाधारण रुपरेषा सांगीतली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन एस.बी. बडकेलवार यांनी केले. स्पर्धेकरीता क्रीडा अधिकारी कार्यालयातील घनश्याम वरारकर, नाजुक उईके, विशाल लोणारे, चंद्रशेखर मेश्राम, कार्यालयातील सर्व मानद कर्मचारी व जिल्हा बॉल बॅडमिंटन संघटनेतील सर्व पदाधिकारी व आशिष निजाम यांच्या मार्गदर्शनात सर्व स्थानिक खेळाडू व राज्य संघटनेकडून तांत्रिक अधिकारी व पंच यांचे मार्गदर्शनात स्पर्धा आयोजन सुरुवात झाली आहे असे जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे हे कळवितात.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!