चंद्रपूर जिल्ह्याच्या धर्तीवर गडचिरोली जिल्ह्याची दारूबंदी समीक्षा करावी

महाराष्ट्र ट्रायबल बॅकवर्ड पीपल अॅक्शन कमिटीची राज्यपालांकडे मागणी
गडचिरोली , १३ फेब्रुवारी : राज्य शासनाने चंद्रपूर जिल्ह्याच्या धर्तीवर दारूबंदी समीक्षा करून या जिल्ह्यातील दारूबंदी हटवावी, अशी मागणी महाराष्ट्र ट्रायबल बॅकवर्ड पीपल अॅक्शन कमिटीच्या वतीने महामहीम राज्यपाल यांच्याकडे केली आहे.
गडचिरोली या निसर्गाचे प्रचंड सौंदर्य लाभलेल्या जिल्ह्यात पर्यटनास वाव असतानाही पर्यटक पाठ फिरवितात. याचे मुख्य कारण याजिल्ह्यातील दारूबंदी असल्याचे मत या कमिटीने मांडले आहे. गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी होऊन आता बराच कालावधी लोटलातरी याबाबत कुठलीही समिक्षा केली जात नाही. या उलट चंद्रपूर जिल्ह्यात केलेली दारूबंदी काही वर्षातच उठविण्यात आली. याचधर्तीवर या जिल्ह्याला न्याय देणे आवश्यक आहे. याला कारण या जिल्ह्यात काही बुद्धिजिवी मठाधिशांची असलेली दादागिरी, मनमानी व बोगसगिरी असल्याने कोणीही यांच्याविरुद्ध बोलत नसल्याचा आरोप या पत्रकात करण्यात आला आहे.
जिल्ह्याच्या विकासासाठी आरोग्य, शिक्षण, रोजगार, रस्ते वाहतूक, नक्षल समस्या याकरिता अशा व्यक्तींनी कोणते प्रकल्पराबविले किंवा शासनाकडे काही पाठपुरावा केला काय, असा प्रश्न विचारला आहे. उलट तुलतुली, कारवाफा सारखे जिल्ह्याच्यासिंचन क्षमतेत भर घालून हरित क्रांती निर्माण करणारे प्रकल्प काही प्रेमळ आदिवासी नेत्यांना हाताशी धरून त्या काळी थांबविले. याचा जाब विचारण्याची आवश्यकता आहे. जिल्ह्यात कोट्यवधी रुपयाचे अनुदान मिळत असले तरी जिल्ह्याच्या विकासात पाहिजेतसा हातभार लावल्या जात नसल्याचे दिसून येते.
या जिल्ह्यात दारूबंदी झाल्यानंतर दारू पिणे व मिळणे कठीण असतानाही व्यसनमुक्तीसारखे करोडो रुपयाचे प्रकल्प राबविल्याचेकारण म्हणजे, शासनाच्या डोळ्यात चक्क धूळफेक आहे मद्यपान निश्चितच वाईट आहे. पण योग्य प्रमाणात त्याचे सेवन केल्यासत्याची हानी होत नाही. जिल्ह्यात दारूबंदी झाल्यानंतर काय फायदे, तोटे झाले याची समीक्षाही करणेही आवश्यक आहे. अवैधदारूविक्रीमध्ये महिला व युवावर्ग गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळत असल्याने एकदा दारूबंदीची समीक्षा करून जिल्ह्यातील दारूबंदीउठविण्यात यावी, अशी मागणी समितीचे अध्यक्ष डॉ. प्रमोद साळवे, उपाध्यक्ष संतोष ताटीकोंडावार, सचिव पुरुषोत्तम भागडकर, कोषाध्यक्ष अनिल मेश्राम यांनी महामहिम राज्यपालांकडे पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.