व्हॉईस ऑफ मिडीया देसाईगंज तालुकाध्यक्षपदी राजरतन मेश्राम तर सचिवपदी इलियास खान यांची निवड

कार्याध्यक्ष प्रा. दिलीप कहुरके तर उपाध्यक्ष अरूण राजगीरे

देसाईगंज , १६ फेब्रुवारी : गडचिरोली जिल्हाध्यक्ष व्यंकटेश दुडमवार यांच्या सुचनेवरून, जिल्हा सचिव विलास ढोरे यांच्याउपस्थितीत १५ फेब्रुवारीला व्हॉईस ऑफ मिडीया देसाईगंज तालुका कार्यकारिणी गठीत करण्यात आली. यात व्हॉईस ऑफ मिडीयातालुका अध्यक्षपदावर राजरतन मेश्राम यांची तर सचिवपदी इलियास खान पठाण यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

व्हाॅईस ऑफ मिडियाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के, प्रदेश कार्याध्यक्ष मंगेश खाटीक, विदर्भ अध्यक्ष किशोर कारंजेकर यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष व्यंकटेश दुडमवार यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण गडचिरोलीजिल्ह्यातील १२ हि तालुक्याची नव्याने कार्यकारिणी बनविण्याचे काम सुरू असून प्रथम चामोर्शी तालुका कार्यकारिणी गठीत होऊनदेसाईगंज तालुक्याची कार्यकारिणी गठीत करण्यात आली.

अध्यक्षपदी राजरतन मेश्राम सचिव पदी इलियास खान पठाण यांची निवड होताच लगेच अध्यक्ष, सचिवांनी आपली सहकारीटिमची कार्यकारिणी सुद्धा त्याच बैठकीत जाहीर केली. यात तालुका कार्याध्यक्षपदावर प्रा. दिलीप कहूरके यांची निवड करण्यातआली. तर उपाध्यक्ष पदी अरूण राजगीरे, संघटक प्रकाशचंद्र दुबे, सहसचिव रविंद्र कुथे, कोषाध्यक्ष महेश सचदेव, कार्यवाहकअरविंद घुटके, प्रसिद्धी प्रमुख पंकज चहांदे तर या सर्वांचे मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ पत्रकार से.नि. मुख्याध्यापक शामराव बारई(गुरुजी) तर सदस्य म्हणून शैलेश पोटवार, हेमंत दुनेदार, नसिर जुम्मन शेख, . वहीद शेख, घनश्याम कोकाडे आदींची निवडकरण्यात आली. यावेळी बहुसंख्य पत्रकार  उपस्थित होते.

सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे जिल्हा सचिव विलास ढोरे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले, संघटनेच्या पुढील वाटचालीकरीताशुभेच्छा दिल्या. तर पत्रकारांच्या समस्या येणाऱ्या अडचणी तसेच खासकरून पत्रकार भवना करीता प्रयत्न करणार असल्याचीग्वाही नवनियुक्त अध्यक्ष/सचिवांनी दिली.

About The Author

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!