April 28, 2025

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त ‘जय शिवाजी जय भारत’ पदयात्रेचे आयोजन

गडचिरोली, १८ फेब्रुवारी : छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५ वी जयंती १९ फेब्रुवारी रोजी साजरी करण्यात येणार असून, या निमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने ‘जय शिवाजी जय भारत’ पदयात्रेसह विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
ही पदयात्रा सकाळी ७.३० जिल्हा परिषद हायस्कूल येथून प्रारंभ होईल आणि – इंदिरा गांधी चौक – कारगील चौक – आय.टी.आय. चौक – छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, शासकीय विश्रामगृह, कॉम्प्लेक्स समोरील उद्यान येथे समाप्त होईल. या पदयात्रेमध्ये विद्यार्थी आणि विविध शासकीय विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होणार असून स्थानिक नागरिकांनीही सकाळी 7.30 वाजता जिल्हा परिषद हायस्कूल चामोर्शी रोड येथे उपस्थित राहून पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.
या आयोजनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी आज नियोजनाचा आढावा घेत पदयात्रेचा मार्ग ठरविणे, विद्यार्थ्यांचा सहभाग निश्चित करणे, क्रीडांगण सुसज्ज ठेवणे आणि स्वच्छतेची व्यवस्था करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे यांनी सर्व विभागांशी समन्वय साधत कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!