विकास विद्यालय तथा थोरवी कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कुरखेडा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची 395 वी जयंती उत्साहात

कुरखेडा, १९ फेब्रुवारी : येथील विकास विद्यालय तथा थोरवी कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची 395 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष आर. लगदेवे सर मुख्याध्यापक विकास विद्यालय कुरखेडा तसेच प्रमुख अतिथी प्राचार्य अनिकेत आकरे सर, प्राध्य. बि.डी. सहारे सर, प्राध्य. कुथे सर, थोरवी कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कुरखेडा. तसेच कार्यक्रमाला उपस्थित पुस्तोडे सर, कोडाप सर, कु. सायली मॅडम, कु.कावळे मॅडम, देशमुख, प्रथम मेश्राम, गोपाल वैरागडे, शिवम कांबळे इत्यादी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनकुकरा सर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्य. डोंगरवार सर यांनी केले कार्यक्रमाप्रसंगी वर्ग 11 वीची विद्यार्थिनी वर्षा सोनकुकरा हिने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर व्याख्यान केले