कुरखेडा येथे शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा

कुरखेडा: हिंदवी स्वराज्याच्या संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती संपूर्ण महाराष्ट्रात एखाद्या मोठ्या सणाप्रमाणे साजरी केली जाते. शिवभक्त परिवार यांच्यातर्फे शिवजन्मोत्सव सोहळा २०२५ चे कुरखेडा शहरात तीन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यामध्ये १८ फेब्रुवारी ला शहरातील बालगोपालांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी वेशभूषा स्पर्धा तसेच नृत्य स्पर्धा घेण्यात आली व वेशभूषा स्पर्धेमध्ये आणि नृत्य स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय असे क्रमांक देण्यात आले. स्पर्धे मध्ये सहभागी होणाऱ्या प्रतेक स्पर्धकाला प्रोत्साहन पर बक्षीस देण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी १९ ला सकाळपासूनच ध्वनीवर्धकावर शाहिरी पोवाडे शिवभक्तीपर गीत वाजवून पूर्ण शहर शिवमय करण्यात आले होते. सकाळी शिवराय मनामनात शिवराय घराघरात या म्हणीला आत्मसात करून मंडळाच्या वतीने ऑनलाईन रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. सकाळी 9:00 वाजता प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण ध्वजवंदना देण्यात आली आणि लगेच दिंडी आणि पालखी सोहळ्याच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. दुपारी एक वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्याभिषेक आरती व पाळण्याचे कार्यक्रम घेण्यात आले. याच दिवशी सायंकाळी पाच वाजता डीजेच्या गजरात भव्य मिरवणूक आणि झाकीचा कार्यक्रम घेण्यात आला. या मिरवणुकीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि अफझल खान यांच्यातील एक प्रसंग देखावा म्हणून चौका चौकामध्ये सादर करण्यात आले. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 20 फेब्रुवारीला झालेल्या सर्व स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित युवांगण म्युझिकल ग्रुप तर्फे शिवमय गीतांचा कार्यक्रम घेण्यात आला आणि आणि मंडळाच्या वतीने महाप्रसादाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी समस्त शिवभक्तांनी पुरेपूर मेहनत घेतली.