“बलात्कार पीडित महिलेवर प्रकरण मागे घेण्यासाठी दबाव होत असल्याचा पत्रपरिषदेतून आरोप”

“३६ वर्षीय महिलेवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला कठोर शिक्षा द्या, भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष गीता हिंगे यांची पत्रकार परिषदेतून मागणी”
कुरखेडा,२६ फेब्रुवारी: १८ फेब्रुवारी रोजी कुरखेडा तालुक्यातील चिखली या गावातील महिला घरी एकट्याचे साधून आरोपी अनिल मच्छिरके वय ३८ वर्ष याने बलात्कार केला. कुरखेडा पोलिस स्टेशन येथे प्रकरण दाखल होवून आरोपी अटक करण्यात आली. सदर प्रकरणात बलात्कार पीडित महिलेवर प्रकरण मागे घेण्यासाठी दबाव होत असल्याचा आरोप आधार विश्वफाउंडेशनच्या अध्यक्ष तथा भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष गीता हिंगे यांनी पत्रकार परिषदेतून केला आहे.
बलात्कार पीडित महिलेचे वय ३६ वर्षे असून तिला १४ वर्षाचा मुलगा व १२ वर्षाची मुलगी आहे त्या आरोपीला कठोर शिक्षा व्हावी वत्या आरोपीला जामीन मिळू नये अशी मागणी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली आहे.
कुरखेडा तालुक्यात चिखली या गावी दि.१८ फेब्रुवारी रोजी ही घटना घडली.कुरखेडा पोलिस विभागाने पीडित महिलेच्या तक्रारीवरआरोपीला जेरबंद केले.सध्या आरोपी न्यायालयीन कोठडीत आहे. २४ फेब्रुवारी रोजी महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष गीता हिंगे याआपल्या महिला सदस्यांसोबत ला घेऊन चिखली या गावात पोहोचल्या तेव्हा पीडित महिलेवर प्रकरण मागे घेण्यासाठी दबाव येत आल्याची माहिती मिळाली असल्याचे सांगितले. पोलीसांनी निष्पक्ष तपास करून सदर आरोपीला कठोर शिक्षा व्हावी व बलात्कार पिडीतमहिलेला न्याय मिळावा अशी ही मागणी या माध्यमातून करण्यात आली. पत्रकार परिषदेला भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाउपाध्यक्षा रुपाली कावळे, वर्षा शेडमाके,सीमा कन्नमवार,रेखा उईके, अल्का पोहणकर,भूमिका बरडे , पायल कोडापे, भारती खोब्रागडे,कोमल बारसागडे ,अंजली देशमुख उपस्थित होत्या.