नागमोडी नाली बांधकाम व रस्त्यावरील अतिक्रमणाच्या विषयावर कुरखेडा येथील नागरिक आक्रमक ; आंदोलनाचा इशारा

कुरखेडा, ५ मार्च : अतिक्रमण करणाऱ्यांना अभय देत होत असलेले नागमोडी नाली बांधकाम व रस्त्यावरील अतिक्रमणाच्या विषयावर कुरखेडा येथील नागरिक आक्रमक झाले असून अतिक्रमण हटविण्यात यावे व नियमानुसार रस्ता रहदारी करीत मोकळा करून येथील नाली सरळ रेषेत बांधकाम करावी या मागणीचे निवेदन मुख्याधिकारी पंकज गावंडे , नगर पंचायत कुरखेडा यांना सादर करून मागणी मान्य न केल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे.

प्रभाग क्रमांक ९ मधे मुख्यमार्ग ला लागून निना पेट्रोलपंप जवळील नाली बांधकाम दोषपूर्ण होत असल्याने बांधकाम तत्काळ बंद करून दोष दूर करणे बाबत मागणी निवेदनात नमूद करण्यात आलेली आहे. गांधी वार्ड, प्रभाग क्रमांक ९ मधील रहिवासी असलेल्या नागरिकांनी निवेदनात स्वाक्षऱ्या केल्या असून प्रत्यक्षात मुख्याधिकाऱ्यांना त्यांच्या दालनात भेटून याबाबत सविस्तर चर्चा केली.
प्रभाग क्रमांक ९ मधे प्रस्तावित नाली बांधकाम मागील एक वर्ष पासून प्रलंबित होता. आता ज्या ठिकाणी ही नाली बांधकाम सुरू केले आहे, त्या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूस अतिक्रमण करून १२ मीटर रस्ता वर अरुंद झालेला आहे. नाली बांधकाम करताना येथील अतिक्रमण काढण्यात असलेले नाही. त्याच प्रमाणे नाली बांधकाम करताना नाली सरळ रेषेत न बनविता अतिक्रमण धारकांना झुकते माप देत नाली नागमोडी पद्धतीने बांधकाम केल्याजात असल्याचे दिसते. नगरपंचायत प्रशासन अतिक्रमण करणाऱ्यांना या प्रकारे अभय देत नालीचे दोषपूर्ण बांधकाम करून १२ मीटर रस्ता कमी करण्याचे काम करत आहे.
या परिसरात बँक, दवाखाने , मेडिकल , खरेदी केंद्र, पॅथेलॉजी, भोजनालय, संगणक प्रशिक्षण केंद्र इत्यादी अस्तित्वात असल्याने लोकांची मोठी वर्दळ असते. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना या रस्त्यावर अतिक्रमण करून रस्ता निमुळता केल्याने भविष्यात वाहतुकीची मोठी समस्या निर्माण होवू शकते.
२०१८ मधे याच मार्गावरील नाली बांधकाम संदर्भात लेखी तक्रार येथील रहिवाश्यांकडून करण्यात आलेले आहे. त्या निवेदनावर अजून पर्यंत काहीच उत्तर नगरपंचायतीने दिलेला नाही. तसेच येथे पक्के बांधकाम करून केलेलं अतिक्रमण अजून काढण्यात आलेले नाही. ज्या ठिकाणी सदर नाली बांधकाम सुरू आहे, तो लेआउट मधील १२ मीटरचा मंजूर रोड आहे. नियमा प्रमाणे गावातील सार्वजनिक रस्ते हे नगरपंच्यातीचे मालमत्ता असते. नगरपंच्यातच्या मालमत्तेवर अतिक्रमण करून केले बांधकाम निदर्शनास आल्या नंतर ही ते अतिक्रमण हटविण्याच्या कामात हेतुपुरस्सर नगरपंच्यात प्रशासन कुचराई करत असल्याचा आरोप ही नागरिकांनी केले आहे.
निवेदनाचे पत्र प्राप्त होताच नगरपंच्यात प्रशासनाने प्रभाग क्रमांक ९ मधे निना पेट्रोलपंप जवळून होत असलेले दोषपूर्ण नाली बांधकाम तत्काळ बंद करावे व १२ मीटर रस्ता मोकळा करून बांधकाम करावे अशी मागणी केली आहे. अन्यथा येथील रहिवासी उपोषणाचा मार्ग अवलंबतील असा इशारा निवेदनातून दिला आहे. सदर आंदोलन दरम्यान कायद्या सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कुरखेडा नगरपंचायत प्रशासन सर्वस्वी जबाबदार असेल असेही निवेदनात नमूद केले आहे.
सदर निवेदन डॉ. भैयालाल राऊत, सौ. गीता कोटांगले, डॉ. मनोज मार्गिया, डॉ. ते. ना. बुद्धे, वामन कोटांगले, राजू टेंभुर्ने सौ. सुनंदागावळे , देवेंद्र जगन्नाथ मेश्राम, शबाना रफिक शेख, दिपक देविदास चहांदे, सुरज बंडूजी बोरसरे, निलेश पाडुरंग चंदनखेडे,बालकृष्ण ठाकरे, विनायक नक्षुलवर, पदमा दशरथ मोटघरे, मुरलीधर देशमुख, राजेश प्रधान, देविदास चहांदे, रमेशजी बगमारे, पुनाजी भाकरे आदी नागरिकांचे सह्या आहेत.