श्रीराम विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय कुरखेडा येथे रंगपंचमी साजरी

“रंगात रंग सारे एक व्हावे दिला गेला विद्यार्थ्यांना संदेश”
कुरखेडा, १३ मार्च: भारतीय सण उत्सवाचे महत्व विद्यार्थ्यांना कळावे याकरिता प्रत्येक भारतीय सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. होळी व रंगपंचमीच्या या पर्वावर
आदिवासी ग्रामीण विकास शिक्षण संस्था द्वारा संचालित श्रीराम विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय कुरखेडा येथे विद्यार्थ्यांना होळी पूजनाचे व रंगपंचमीच्या सणाचे महत्त्व पटवून देऊन विद्यार्थ्यांना रंगात रंग सारे एक व्हावे असा संदेश यावेळी
आदिवासी ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे सहसचिव तथा प्राचार्य,नागेश्वर फाये, यांनी दिला.
यावेळी विद्यार्थ्यांनी शालेय पटांगणावर प्राध्यापक, प्राध्यापिका शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व वर्ग मित्र यांच्यासोबत रंगपंचमी खेळल्या गेली.
यावेळी श्रीराम विद्यालययातील शिक्षक एस. आर .कोडापे, एस . बि.शिरपूरवार,डी. एम नाकतोडे, व्ही. व्हीं. फाये, विलास मेश्राम, वासुदेव मस्के, आर. एम. पंधरे, प्रा.प्रदीप पाटणकर,प्राध्यापिका अश्विनी एच फाये, प्रा . विनोद नागपूरकर, प्रा.सत्यम फटिंग, गोकुल खंडवाये, प्राध्यापिका रागिणी दखने, विशाखा खुणे, अपूर्वा बांबोळे, प्रियका उईकें, स्नेहा दहीकर, नंदिनी कोटांगले आरती कवाडकर, वरिष्ठ लिपिक एच.व्हि.भरणे, भास्कर बारसागडे, ए एस. परशुरामकर, शिपाई के. एम. बनसोड , हरीश टेलका, स्वप्निल खोब्रागडे, व श्रीराम व संस्कार कनिष्ठ महाविद्यालय कुरखेडा येथील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी एकमेकांना गुलाल लावून होळीच्या व रंगपंचमीच्या भरभरून शुभेच्छा दिल्या. यावेळी शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी रंगपंचमीचा आनंद लुटता.