May 24, 2025

अखेर जनआक्रोशापुढे नमले नगरपंचायत प्रशासन; अतिक्रमण हटवुनच नाली बांधकाम होणार

“तक्रारदारांना आज मुख्याधिकारी पंकज गावंडे यांनी लेखी पत्र पाठवून नाली सरळ रेषेत व अतिक्रमण काढूनच केले जातील असे आश्वासन देणारे पत्र दिले आहे”

कुरखेडा, १३ मार्च : अतिक्रमण न काढता होत असलेल्या नागमोडी नाली बांधकाम बाबत गांधी वार्ड, प्रभाग क्रमांक ९ येथील रहिवाशांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेपुढे नगरपंचयात प्रशासन नमले असून नागमोडी नाली बांधकाम थांबवत येथील अतिक्रमण काढण्याच्या प्रक्रियेला लागली असल्या बाबत लेखी पत्र येथील तक्रारकर्त्यांना दिला आहे.
मागील आठवड्यात प्रभाग क्रमांक ९ मधे नगरपंचायत अंतर्गत बोदेले ते निना पेट्रोल पम्प पर्यंत प्रस्तावित नालीचे बांधकाम कंत्राटदाराने सुरू केले होते. सदर नाली बांधकाम दोषपूर्ण व नागमोडी बांधकाम होत असल्याची लेखी तक्रार येथील रहिवाश्यांनी मुख्याधिकारी सह जिल्हा प्रशासनाकडे केली होती. याबाबत लोकमतने नागरिकांच्या हक्काच्या या प्रकरणात वाच्यता फोडत नागरिकांचा आवाज बुलंद करत नियमित बातम्याही प्रकाशित केल्या होत्या. या सर्व बाबींची व नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत जिल्हा प्रशासन सह येथील सहायक जिल्हाधिकारी तथा कुरखेड्याचे उपविभागीय अधिकारी रणजित यादव मुख्याधिकारी यांनीही नाली बांधकाम नियमानुसार होत आहे की नाही याची चौकशी करून तत्काळ अहवाल सादर करण्याच्या सूचना मुख्याधिकारी नप कुरखेडा यांना केल्या होत्या. या सर्व घडामोडींनंतर अतिक्रमण न काढता नाली बांधकामाचा घाट बांधलेले नगरपंचायत प्रशासन नमते होवून नाली बांधकाम थांबवत १२ मीटर सर्व्हिस रोड वर बांधकाम केलेल्या सर्व लोकांना नोटीस बजावून जागेचे व बांधकामाचे दस्तऐवज तत्काळ सादर करण्याचे सूचना केले असल्याचे समजते.
उपरोक्त संदर्भिय विषयाच्या अनुषंगाने प्रभाग क्र. 9 मध्ये नाली बांधकाम सुरु असुन सदर नाली बांधकामामुळे 12 मिटरचा रस्ता अरुंद होत असुन रत्याची रुंदी कमी होत असल्याबाबतची तक्रार संदर्भिय अर्जान्वये या कार्यालयास सादर केलेली आहे.
येथील तक्रारकर्त्यांना पाठविलेल्या
पत्रात नमूद केले आहे की, प्रभाग क्र. 9 मध्ये सुरु असलेल्या नाली बांधकामाच्या रोडची रुंदि लेऑऊट नकाशानुसार 12 मिटर असुन सदर रोडच्या एकाच बाजुने सुरु असलेली नाली बांधकाम ही रोडच्या मध्यभागापासुन 6 मिटर अंतरावर घेण्यात आलेली आहे. व नाली बांधकाम सरळ रेषेतच घेण्याबाबत कंत्राटदारास आदेशीत करण्यात आले असुन सदरील रोडवर झालेले अतिक्रमण हटवुनच नाली बांधकाम करण्याचे काम सुरु असुन रोडवरील अतिक्रमण धारकांना कसल्याही प्रकारचे झुकते माप देण्यात आलेले नाही असे म्हटले आहे.
मात्र रोडवर विज वितरण कंपणीचे डी.पी. असुन सदर रोड रुंदी करणाकरीता डी. पी. हटविणेबाबत संदर्भात संदर्भिय कार्यवाही सुरु आहे. तसेच झाडे हटविणेकरीता या कार्यालयाकडुन कारवाई सुरु आहे. व पेट्रोलपंप ते शामराव उईके यांच्या घरापर्यंत असलेल्या रोडलगत असलेल्या मालमत्ता धारकांनी 12 मिटर रोडवर अतिक्रमण क्रमण करुन बांधकाम केल्याचे या कार्यालयाचे निदर्शनास आले. आहे. त्यामुळे सदर 12 मिटरचा रुंदिचा रोड मोकळा करणेस्तव रोडलगत असलेल्या मालमत्ता धारकांकडुन त्याच्या मालकीचे दस्ताऐवज, बांधकाम परवानगी, मोजनी नकाश इत्यादी कागदपत्रे मागविण्याकरीता पत्र देण्यात आलेले आहे. सदर कागदपत्र प्राप्त होताच कागदपत्रांची तपासणी करुन 12 मिटर रुंदिचे रोडवरील संपुर्ण अतिक्रमण हटवुन नाली बांधकाम करण्यात येईल असे पत्रात उल्लेखित आहे.

नाली बांधकामाचे कंत्राट वर्षभरापूर्वी, मग बांधकाम करण्यास विलंब का?”
नगरपंचायत कुरखेडा यांनी वर्ष भरापूर्वी गांधी वार्ड, प्रभाग क्रमांक ९ मधील नाली बांधकाम संदर्भात ऑनलाईन निविदा मागवून कमी दर असलेल्या कंत्राटदारा सोबत करारनामा करून कार्यारंभ आदेश निर्गमित करून बांधकाम करण्याचे आदेश दिले होते. एक वर्ष एक महिना झाल्या नंतर प्रत्यक्ष बांधकाम सुरू करण्यात आला. सुरू असलेले नाली बांधकाम दोषपूर्ण असल्याचे लक्ष्यात येताच येथील रहिवाश्यांनी बांधकामास विरोध दर्शविला व बांधकाम थांबवून आधी अतिक्रमण काढून मार्ग मोकळा करण्याची मागणी करत मागणी मान्य न केल्यास आंदोलनाचा इशारा देत आक्रमक पवित्रा घेतला होता. मात्र या एका वर्षात नगरपंचायत प्रशासनाला या ठिकाणी असलेले अतिक्रमण लक्ष्यात येवू नये व अतिक्रमण न काढताच नागमोळी नळी बांधकाम बाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!