कुरखेडा शहराला जल शुद्धीकरण प्रकल्प उभारणीसाठी निधी द्या, सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांना तालुका शिवसेनेचे निवेदन

कुरखेडा, २० मार्च : कुरखेडा शहराला जल शुद्धीकरण प्रकल्प उभारणीसाठी निधी मिळावा या मागणीचे निवेदन सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांना तालुका शिवसेनेचे वतीने गडचिरोली येथे देण्यात आले.
२०१५ साली कुरखेडा ग्रामपंचायतचे रूपांतर नगर पंचायत मधे झालेले आहे. नगरपंचायत स्थापने पासून प्रथम पंचवार्षिक काळात येथील पिण्याच्या पाण्याची समस्या मार्गी लागणे अपेक्षित होते. परंतु आजतागायत यावर कुठलेही नियोजन स्थानिक पातळीवर झाल्याचे दिसत नाही. गावात गेल्या अनेक दिवसांपासून स्वच्छ पाणी पुरवठ्याची समस्या गंभीर बनली आहे. गावाला मिळणारापाणी पुरवठा अनियमित आणि अपुरा आहे. मिळणारे पाणी दूषित आणि पिण्यायोग्य नाही. पाण्याच्या कमतरतेमुळे गावातीलनागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. दूषित पाण्यामुळे गावातील लोकांमध्ये विविध आजार पसरण्याची शक्यताआहे.
गावाला नियमित आणि पुरेसा शुद्ध पाणी पुरवठा करावा. पाणी शुद्धीकरण प्रकल्पाची स्थापना करावी. गावातील जलस्त्रोतांचीस्वच्छता आणि देखभाल करावी. पाणी पुरवठा यंत्रणेची नियमित तपासणी आणि दुरुस्ती करावी. आपण या समस्येची गांभीर्यानेदखल घेऊन त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आलेली आहे.
निवेदन सादर करताना शिवसेना तालुका अध्यक्ष अनिकेत आकरे, ईश्वर ठाकूर तालुका संघटक, मुकेश माकडे तालुका प्रसिद्धीप्रमुख, शहेजाद हाश्मी तालुका वैद्यकीय प्रमुख, दीपक धारगाये युवासेना तालुका प्रमुख, चेतन मैंद युवासेना शहर अध्यक्ष आदी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ता प्रामुख्याने उपस्थित होते.