“महसूल सेवक (कोतवाल) यांनी चतुर्थ श्रेणी मिळण्याच्या मागण्यांसाठी आजपासून पुकारले राज्यव्यापी काम बंद आंदोलन”

“२० मार्च पासून राज्यातील सर्व महसूल सेवक संघटनेचे राज्याध्यक्ष श्री नामदेव शिंदे यांच्या नेतृत्वात आझाद मैदान, मुंबई येथे बेमुदतकामबंद आंदोलन धरणे आंदोलनास बसणार आहेत”

कुरखेडा, १९ मार्च : महसूल सेवक (कोतवाल) यांना चतुर्थ श्रेणी देण्यात यावी या प्रमुख मागणी करिता संघटनेची राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा करण्यात आली असून कुरखेडा येथील शाखेच्या वतीने तहसीलदार कुरखेडा यांना सदर निवेदन सादर करून तालुक्यातील सर्व कोतवाल आंदोलनात सहभागी होत असल्याची माहिती देण्यात आली. विदर्भ तथा कुरखेडा तालुका अध्यक्ष रवींद्र बोदेले यांच्या सह तालुक्यातील सर्व महसूल सेवक यांच्या उपस्थितीत

सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य महसूल सेवक (कोतवाल) यांची 40-50 वर्षापासून प्रलंबित असणारीचतुर्थ श्रेणीची मागणी अजूनही शासनाने पूर्ण केलेली नाही. याउलट 10% मानधनवाढ तेही सन 2026 पासून लागू केल्यानेराज्यातील महसूल सेवक (कोतवाल) यांच्यावर अन्यायकारक निर्णय झाल्याने शासनाविरुद्ध असंतोष निर्माण झाला आहे.

महसूल सेवक (कोतवाल) यांची इंग्रज काळापासून चालू असलेली वेतन श्रेणीची मागणी मंजूर करून आम्हाला पुन्हा आंदोलन करावेलागणार नाही यासाठी महाराष्ट्रातील सर्व महसूल सेवक (कोतवाल) यांना आपल्या शासन काळात न्याय द्यावा. सध्या सुरुअसलेल्या अर्थसंकल्पामध्ये महसूल सेवक (कोतवाल) यांच्याबाबतीत कोणताही निर्णय झाल्याने तसेच आमच्या मागण्या दिनांक19/03/2025 पर्यंत मान्य झाल्यास नाईलाजाने दिनांक 20/03/2025 रोजी सकाळी 11 वाजेपासून महाराष्ट्र राज्यातील सर्वमहसूल सेवक (कोतवाल) आझाद मैदान, मुंबई येथे बेमुदत कामबंद आंदोलन धरणे आंदोलनास बसणार आहे. आझाद मैदान, मुंबई येथे होणाऱ्या बेमुदत कामबंद आंदोलन धरणे आंदोलनास कुरखेडा तालुका महसूल सेवक (कोतवाल) संघटनेचा पूर्णसंख्येने सहभाग असेल या दरम्यान बेमुदत उपोषण कालावधीत night duty, चेक पोस्ट duty, राजस्व कॅम्प तथा सर्व महसुली  इतर कामे कडेकोट बंद करण्याचे एक मताने ठराव घेऊन मंजूर करण्यात आला. सभेला सर्व महसूल सेवक उपस्थित होते, मुबईकरिता बेमुदत कामबंद आंदोलन जाण्याचे ठरले.

या बेमुदत काळात कोणीही साझा / तहसील मध्ये जाणार नाही अन्यथा ५०० रूपे दंड आणि संघटनेचे सदस्यत्व रद्द करण्याचे एकमताने ठराव पारित करण्यात आला आहे.

या प्रसंगी दामोदर नाकाडे, अशोक उईके, मयुर उइके, अमर होळी , जितेंद्र अंबादे, मोहन मडावी, प्रल्हाद हलामी, अविनाश कोडाप, गौरव नहामूर्ते, गेंदराव मारगाये, अनिल सयाम, शीला कोकोडे, गायत्री फाफणवाडे, गायत्री कुमरे, काजल उईके, रूपा नैताम, पवन मडकाम, यादव दडमल, गिरीधर कोडाप आदी महसूल सेवक उपस्थित होते.

About The Author

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!