April 25, 2025

कुरखेडा तहसीलने अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कार्यवाही करत वसूल केले ५० लाखाचे महसूल

कुरखेडा महसूल विभागाने आर्थिक वर्ष २०२४-२५ मधे ४० वाहनांवर जप्ती कार्यवाही करत आजपर्यंत एकूण ४७ लाख ४४ हजार रुपये महसूल शासन दरबारी जमा केले आहे

कुरखेडा, २० मार्च : रेती घाट लिलाव न झाल्याने तालुक्यात मोठ्याप्रमाण अवैध रेती उपसा होत असतो. रात गस्त, चेकपोस्ट असून ही रेती तस्कर रेती उपसा करत आहेत. अश्यातच या अवैध गौण खनिज उपश्या विरोधात कार्यवाही करत कुरखेडा महसूल विभागाने मागील आर्थिक वर्षात शासनाच्या तिजोरीत तब्बल ४८ लाख रुपये महसूल जमा केला आहे.

एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीत महसूल विभागाने ४० वाहनांवर जप्ती कार्यवाही केली आहे. या अवैध वाहतूक वाहनांमध्ये अवैध मुरूम वाहतूक करणारे एकूण ९ वाहने असून ३१ वाहन हे अवैध रेती वाहतूक करताना आढळलेले आहेत. या ४० वाहनानपैकी ३८ वाहन चौकशी अंती प्रत्यक्ष दंडास पात्र ठरले आहेत.

मुजोर मुख्य तस्करांना कधी आवरणार?

एवढ्या मोठ्या प्रमाणात कार्यवाह्या करून शासनाचा महसूल वसूल करणाऱ्या येथील तालुका प्रशासनसमोर मुख्य तस्करांचे मोठे आवाहन आहे. या मुख्य तस्करांच्या मुस्क्या कधी आवरण्यात येथील असा प्रश्न नेहमी उपस्थित केला जातो. महसूल विभाग या मुजोर गुंडगिरी करणाऱ्या रेती तस्करांच्या मुसक्या आवळण्यात कमकुवत ठरत आहे. या तस्करांच्या वाहनांवर कार्यवाही झाल्या मोठ्याप्रमाणत महसूल तर वसूल होईलच सोबतच येथील रेती तस्करीच्या माध्यमाने पोसली जाणारी गुंडगिरीवर ही नियंत्रण मिळविता येईल.

अवैध रेतीसाठ्यांवर नोटीस बजावले, दंडास पात्र ठरल्यास होणार पाचपट दंड”

कुरखेडा येथे मोठ्या प्रमाणात अवैध मार्गाने पोचत असलेली रेती साठ्यांवर पंचनामे करून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. नोटिस बनवलेल्या रेती साठा धारकांकडे रेती संबंधी  वैध पुरावे सादर न केल्यास त्यांना पाचपट दंड भरवलगणार आहे. या दंडामुळे शासनाच्या तिजोरीत लाखो रुपयाचा महसूल जमा होणार आहे.

अवैध विटा भट्टींचे पंचनामे करून बजावल्या नोटीस”

रेती , मुरूम सोबतच तालुक्यात मोठ्या प्रमाणात लाल विटा निर्मिती केल्या जाते. सध्या घरकुल मोठ्याप्रमाणत मंजूर झाल्याने विटांची मोठी मागणी आहे. अवैध मार्गाने मोठ्या प्रमाणात विटा तयार करून विकल्याजतात ज्याचा शासनाला मोठा फटका बसतो. लाखो रुपयाचा महसूल या बुडात आहे. नियमानुसार माती पासून या विटा बनविण्या आधी महसूल विभागाकडे रीतसर अर्ज करून परवाना मिळविणे बंधनकारक आहे. परंतु असे परवाने न घेता मोठ्या प्रमाणात विटा निर्मिती व विक्री केली जाते. येथील महसूल विभागाने या वर्षी काही अवैध विटा निर्मिती करणाऱ्यांना नोटिस बजावून दंड आकारले आहेत.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!