“सेवानिवृत्त शिक्षकांचा सपत्नीक सत्कार व निरोप समारंभ संपन्न”

Screenshot
कुरखेडा, २० मार्च : येथील विकास विद्यालय तथा थोरवी कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कुरखेडा येथे नुकताच सेवानिवृत्त शिक्षकांना निरोप देत सपत्नीक सत्कार करण्यात आला.
१९ मार्च रोज बुधवारला आयोजित निरोप समारंभ कार्यक्रम कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान प्रज्ञा शील करुणा संस्थेचे अध्यक्ष पी.आर. आकरे यांनी भूषविले तर प्रमुख पाहुणे म्हणून थोरवी कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य अनिकेत आकरे, मुख्याध्यापकअलगदेवे विकास विद्यालय कुरखेडा, श्री. खुणे सर, श्री कोचे सर उपस्थित होते. या समारंभात विकास विद्यालयातून सेवानिवृत्त झालेले सहाय्यक शिक्षक एम. एस. खोब्रागडे तसेच सहाय्यक शिक्षक के.डी. बुरडे यांचा शाल श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाप्रसंगी प्रा. सहारे सर, प्रा. गजबे सर, प्रा. खेत्रे मॅडम, प्रा.गायकवाड मॅडम, प्रा. कुथे सर, थोरवी कला व विज्ञानकनिष्ठ महाविद्यालय कुरखेडा. श्री. पुस्तोडे सर, श्री. सोनकुकरा सर, श्री. लांजेवार सर, श्री. कुथे सर, सायली मस्के मॅडम, कावडेमॅडम, देशमुख मॅडम, गोपाल वैरागडे, प्रथम मेश्राम, देशमुख प्रयोगशाळा परिचर, इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालनप्राध्यापक मोहित डोंगरवार यांनी केले. तर आभार प्रदर्शन रितेश कोडाप यांनी केले.