April 26, 2025

“२८ मार्चला गडचिरोली येथे पदवीधरांसाठी रोजगार मेळावा; विवीध क्षेत्रातील ४० कंपन्यांचा असणार सहभाग”

“गोविंदराव वंजारी फाऊंडेशनचे आयोजन : 10 हजारांवर बेरोजगार सहभागी होण्याची शक्यता”

गडचिरोली, २३ मार्च : विपुल खनिज संपदेने समृद्ध असलेल्या आणि आता स्टील निर्मितीचा जिल्हा म्हणून नावारूपास येणाऱ्यागडचिरोली जिल्ह्यातील पदवीधर बेरोजगारांसाठी गोविंदराव वंजारी फाऊंडेशनच्या वतीने 28 मार्चला सकाळी 10 ते 6 या वेळेतयेथील महाराजा सेलिब्रेशन हॉल, धानोरा रोड येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या मेळाव्यात महाराष्ट्रातील नामांकित कंपन्यांचा सहभाग राहणार असून गडचिरोली जिल्ह्यातील सुमारे 10 हजारांवर बेरोजगारपदवीधर यामध्ये सहभागी होणार असल्याची शक्यता आहे. नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲड. अभिजित वंजारीयांच्या पुढाकारातून होत असलेल्या या मेळाव्यात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. सदर मेळाव्यातनिर्मिती, आय.टी. ऊर्जा, ऑटोमोबाईल, बँकिंग क्षेत्रातील राज्यभरातील सुमारे 40 नामांकित कंपन्यांचा सहभाग राहणार आहे. पदवी शिक्षण घेत असलेले आणि पदवीधर या मेळाव्यात सहभागी होऊ शकतात. उमेदवारांचे शिक्षण ज्या क्षेत्रातील आहे, त्याक्षेत्राशी संबंधित कंपनी उमेदवारांच्या मुलाखती घेतील. थेट मुलाखतीच्या माध्यमातून त्याच ठिकाणी उमेदवारांची निवड करूनत्यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात येणार आहे.

सदर रोजगार मेळाव्यात गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील पदवीधर बेरोजगार सहभागी होऊ शकतील. तत्पूर्वी त्यांनाऑनलाईन नोंदणी करावी लागेल. www.abhijitwanjari.com या वेबसाईटवर जाऊन ही नोंदणी करता येईल. ऑनलाईननोंदणी सुरू असून आतापर्यत गडचिरोली जिल्ह्यातील सुमारे तीन हजारांवर पदवीधर बेरोजगार आणि पदवी शिक्षण घेणाऱ्याविद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. नोंदणी झालेल्या उमेदवारांनी 28 मार्च रोजी नियोजित ठिकाणी शैक्षणिक पात्रतेचे सर्व कागदपत्रेघेऊन उपस्थित राहणे बंधनकारक आहे. संबंधित उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार संबंधित कंपनीना देण्यात आलेल्या क्रमांकाचेटोकण उमेदवारांना देण्यात येईल. त्यानुसार, संबंधित क्रमांकाच्या दालनात त्यांची मुलाखत होईल. निवड झालेल्या उमेदवारांनामेळाव्यातच नियुक्तीपत्र देण्यात येईल.

गोविंदराव वंजारी फाऊंडेशन आयोजित पदवीधर रोजगार मेळाव्याचे उद्‌घाटन सकाळी 10 वाजता . अभिजित वंजारी, जिल्ह्यातील अधिकारी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत होईल. यावेळी रोजगाराच्या आणि स्वयंरोजगाराच्या दृष्टीने विविध क्षेत्रातीलमान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे. मेळाव्याच्या ठिकाणी विद्यार्थी आणि पालकांसाठी अभ्यागत कक्ष, नोंदणी कक्ष, माहिती कक्षउभारण्यात येणार आहे. मेळाव्यात येणाऱ्या युवकांना योग्य मार्गदर्शन करण्याच्या दृष्टीने स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात येणारआहे. मेळावा आयोजनाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. या मेळाव्यात जास्तीत जास्त पदवीधर बेरोजगारांनी सहभागी होऊन संधीचालाभ घ्यावा, असे आवाहन नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲड. अभिजित वंजारी यांनी केले आहे

About The Author

You may have missed

error: Content is protected !!