अवकाळी पावसाचा फटका, मक्याच्या पिकाचे नुकसान; शेतकऱ्यांचे अश्रू पुसणार कोण?

गडचिरोली, २४ मार्च : गडचिरोलीस जिल्ह्याच्या काही भागात रविवारी संध्याकाळी अचानक वातावरणात बदल होऊन वादळीवाऱ्यासह पावसाला सुरूवात झाली. ढगांच्या गडगडाटाने आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या पावसाने अनेकांची तारांबळउडाली. अर्ध्या तासानंतर पावसाचा जोर कमी झाला, मात्र या पावसाने झाडांवरील कच्चे आंबे गळून पडले. तसेच मका पिकालामोठा फटका बसला आहे.
पालकमंत्री येणार का शेतकऱ्यांच्या बांधावर?
दरम्यान जिल्ह्यात रानटी हत्तींपाठोपाठ अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केल्याने शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे. हत्तींचा प्रकोप दिवसेंदिवस वाढतच आहे. पण जिल्ह्याला दोन–दोन पालकमंत्री असताना एकाही पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्याबांधावर जाऊन कधी त्यांचे अश्रू पुसले नाही, ना अजूनपर्यंत काही उपाययोजना करण्याचे आदेश दिले, अशी टिका काँग्रेसचेजिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केली आहे. फक्त उद्योगपती मित्रांच्याच कार्यक्रमासाठी दोन्ही पालकमंत्री हवाई सफर करतात, मात्र गळा फोडून रडणाऱ्या शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी व त्यांना न्याय देण्यासाठी पालकमंत्री हवाई सफर करतील का? असासवाल त्यांनी केला आहे.
माजी खासदार नेते यांनी केली शेतपिकांची पाहणी
जिल्ह्यात गेल्या तीन दिवसात अवकाळी पाऊस आणि काही भागात झालेल्या गारपिटीमुळे मक्याच्या पिकाचे मोठे नुकसान झालेआहे. माजी खासदार तथा भाजपचे राष्ट्रीय महामंत्री (एसटी मोर्चा) डॉ.अशोक नेते यांनी चामोर्शी तालुक्यातील विकासपल्ली, रेगडीआणि घोट परिसरातील शेतात जाऊन पाहणी केली. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हतबल झाले असल्याने तातडीने पंचनामेकरून त्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी डॉ.नेते यांनी केली आहे.
यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. मका हे या भागातील प्रमुख दुबार पीक आहे. पण वादळीपावसामुळे या पिकाची मोठी हाणी झाली आहे. या नुकसानीबद्दल मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीसयांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या मदतीसाठी योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन यावेळी डॅा.नेते यांनी दिले.
या पाहणीच्या वेळी मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ.प्रणय खुणे, डॉ.भारत खटी, जेष्ठ नेतेबिरेन, नानू उपाध्याय, रमेश अधिकारी, तलाठी कोडापे, तसेच परिसरातील शेतकरी व नागरिक उपस्थित होते.