April 25, 2025

अघोषित लोडशेडींग विरोधात मालेवाडा येथील विज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडकला मोर्चा

कुरखेडा,२४ मार्च : वीज वितरण कंपनी द्वारे दिवसा अघोषित भारनियमन सुरू करण्यात असल्याने त्रस्त झालेल्या मालेवाडा परिसरातील शेकडो नागरिकांनी येथील कार्यालयावर मोर्चा काढत भारनियमन बंद करून नियमित वीज पुरवठा करण्याची मागणी केली आहे.

काल रविवारला दुपारी १२ वाजता दरम्यान कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा विज वितरण कंपनीच्या कार्यालयावरमालेवाडा,सुरसुंडी, अंगारा तसेच लगतच्या परिसरातील शेतकरी शेतमजूर तसेच घरगुती विज ग्राहकांनी शेकडोच्या संख्येने सहभागी होत मोर्चा काढला होता. सदर मोर्च्याचे नेतृत्व नंदुभाऊ नरोटे सरसेनापती आविस तथा माजी जि..सदस्य गडचिरोली, तुलशिदासबोगा माजी पं..सदस्य तथा उपसरपंच ग्रामपंचायत मालेवाडा यांनी केले.

विज वितरण कंपनीच्या वतीने दिवसा अघोषित लोडशेडींग करण्यात येत असल्याने रबी हंगामातील धान पिक, मका पिक, भाजीपाला इतरही पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या अघोषित भारनियमन मुळे शेतकरी , मजूर लोकांना मोठा त्राससहन करावा लागत आहे.

येथील वीजवितरण विभागाच्या कार्यालयावर धडकलेल्या मोर्चाने येथील उपविभागीय अभियंता मुरकुटे यांना मागण्यांचा निवेदन सादर केला. या निवेदनात प्रामुख्याने मालेवाडा उपकेंद्रा अंतर्गत येत असलेल्या अंगारा, सुरसूंडी, मालेवाडा फीडर वरील अघोषितलोडशेडींग तात्काळ बंद करण्याच्या मागणी सह , शेतकऱ्यांना २४ तास वीज पुरवठा देणे , घरगुती विज आकारणी चे दर कमीकरणे, डिमांड भरलेल्या शेतक-यांना तात्काळ विज जोडणी करून देणे, आदीवासी शेतकऱ्यांना दिड पाईंटची फिंटीग आदीवासीविकास विभागाकडुन मोफत देणे , अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.

सदर मोर्चा मधे मालेवाडा परिसरातील चर्विदंड, यडसकुही, दामेश्वर , धनेगाव, कातलवाडा, रानवाही, खोब्रामेंढा, नवेझरी, मेंढा, खांबाडा, इरुपटोला, सावतला,  सुरसुडी मुस्का, पळसगाव, मंगेवाडा अशा परिसरातील अनेक गावांतील गावकरी, महिला, शेतकरी,शेतमजूर, शेकडोच्या संख्येने मोर्च्यात सहभागी झाले होते.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!