आशा दिनानिमित्त आशा वर्करांचा सत्कार, विविध स्पर्धांचे आयोजन

“आशा वर्कर म्हणजे समाज आणि आरोग्य विभागातील महत्त्वाचा दुवा – डॉ.लूबना हकीम यांचे प्रतिपादन”
अहेरी, २४ मार्च : आरोग्य विभाग आणि समाज यांच्यातील महत्वाचा दुवा म्हणजे आशा वर्कर असून त्यांच्या सेवा, समर्पण आणिअविरत कार्यामुळेच समाजात वैद्यकीय सेवा देणे सोयीचे होते. त्या वैद्यकीय सेवेतील अविभाज्य घटक आहेत, असे प्रतिपादनमहागाव आरोग्य केंद्राच्या महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. लुबना हकीम यांनी येथे आशा दिनानिमित्त आयोजित आशा वर्करांच्या सत्कार, विविध स्पर्धां कार्यक्रमा दरम्यान केले.
यावेळी कल्याणी नैताम बीसीएम, भारती गोगे एलएचवी आणि श्रीकांत चव्हाण बीसीएम मुलचेरा आदी प्रमुख पाहुणे म्हणूनउपस्थित होते.
राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत जिल्हा आरोग्य विभाग गडचिरोली जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने अहेरी येथीलकन्यका मंदिर येथे आयोजित आशा दिना निमित्त त्या उद्घाटक म्हणून बोलत होत्या. पुढे डॉ हकीम म्हणाल्या की आशा वर्कर यांनीआपल्या कार्याने आणि परिश्रमाने ग्रामीण भागातील आरोग्य सेवांचे स्तर उंचावत ठेवला आहे. अशांचे कार्य आणि सेवा अनमोलअसून त्यांनी आपल्या कार्याने न केवळ आरोग्य सेवा सुलभ केल्या तर समाजात आणि ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये आरोग्यसेवेविषयी मानसिकता आणि विश्वासहर्ता निर्माण केली. आशा वर्कर म्हणेच फक्त नावातच आशा नसून आरोग्य विभाग आणिसमाज यांच्या मधातील आशा आहेत.
यावेळी उत्कृष्ट कामगिरी बद्दल आशा वर्कर यांचा सन्मान करण्यात आला. उमा चाकूरकर यांना तालुकास्तरीय प्रथम पुरस्कार, राजुबाई पुल्लूरवार यांना द्वितीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करीतचा पुरस्कार महागाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे आशा वर्कर ज्योतिका तलांडे, हर्षा गर्गम, सरिता आत्राम, आलापल्लीप्राथमिक आरोग्य केंद्राचे आशा वर्कर छाया उराडे, आशा सातारे यांच्यासह जिमलगट्टा येथील दोन, देचलीपेठा येथील दोन, कमलापूर येथील तीन, पेरमिली येथून तीन आशा वर्कर यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.