“राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या कुरखेडा तालुका अध्यक्षपदी रुपालीताई कावळे यांची नियुक्ती”

चामोशी , २५ मार्च : तालुक्यातील घोट येथे राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या कार्यकारणीची बैठक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणयखुणे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली या बैठकीत संघटनेच्या विविध पदांवर नियुक्ती देत संघटनेचे कार्य जिल्ह्यातील शेवटच्या घटका पर्यंत पोहचविण्याचे आवाहन खुणे यांनी केले. सदर बैठकीत कुरखेडा तालुक्याची जबाबदारी सामाजिक कार्यकर्त्या रुपालीताई कावळे यांना देण्यात आली असून कुरखेडा तालुका अध्यक्षपदाची नियुक्ती करून नियुक्तीपत्र बहाल करण्यात आले आहे.
यासोबतच विदर्भ व जिल्ह्यातील इतर तालुक्याच्या जबाबदाऱ्या ही सोपवण्यात आल्या आहेत. वडसा येथील नेताजी सोंदरकर यांचीनियुक्ती संघटनेच्या विदर्भ कार्याध्यक्षपदी करण्यात आली आहे. राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमध्येसंघटन मजबूत करणे करीत व सर्व जिल्हा कार्यकारिणी घोषित करण्याची जबाबदारी सोंदरकर पूर्णवेळ देवून कार्य करणारअसल्याची ग्वाही यावेळी दिली. राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या माध्यमातून सर्वसामान्य गोरगरीब तळागाळातील शोषित वंचितांनान्याय देण्यासाठी नेताजी सोंदरकर गेल्या अनेक वर्षापासून प्रामाणिकपणे काम करीत आहेत. त्यांच्या कामाची दखल घेऊन संघटनेनेत्यांना विदर्भ कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी दिलेली आहे.
वडसा तालुकाध्यक्षपदी रजनीकांत गुरनुले, ब्रह्मपुरी तालुका अध्यक्षपदी अंकुश कांबडी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चामोर्शी तालुका अध्यक्षपदी कालिदास बन्सोड यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रामुख्याने कालिदास बन्सोड गेल्या अनेकवर्षापासून दैनिक वृत्तपत्रात शोषित वंचितांचा आवाज बुलंद करून आपल्या कार्यतत्पर लेखणीच्या माध्यमातून सर्वसामान्य गोरगरीबजनतेला न्याय मिळवून देत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना संघटनेच्या चामोर्शी तालुका अध्यक्षपदी नियुक्ती देण्यातआलेली आहे. याबद्दल प्रदेशाध्यक्ष प्रणय भाऊ खुणे,राष्ट्रीय प्रवक्ता ग्यानेंद्र विश्वास, प्रदेश उपाध्यक्ष भारत खटी, राहुल झोडे, विदर्भअध्यक्ष जावेद सय्यद, गोंदिया जिल्हा अध्यक्ष गुड्डू भाऊ खुणे, जिल्हाध्यक्ष मनीषाताई मडावी, जिल्हा संघटिका अनिता रॉय, जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी,जिल्हा उपाध्यक्ष मुन्ना डहारे, , कृष्णा वाघाडे,नानू उपाध्ये, महिला आघाडी तालुका अध्यक्ष विशाखासिन्हा,शरीफ शेख, किशोर देवतळे, दिनेश मुजुमदार,सुमेन विस्वास, विकास मैत्र, सरपंच कृष्णा मंडल, उपसरपंच प्रकाश सरकारयांनी अभिनंदन केले आहे.