युवासेना घेणार नीट-सीईटी मॅाक टेस्ट, होतकरू विद्यार्थ्यांसाठी गडचिरोली व आरमोरीत २९ मार्चला परीक्षेचे आयोजन

गडचिरोली, २५ मार्च : आर्थिक क्षमता नसल्याने खासगी क्लासेसच्या माध्यमातून नीट आणि वेगवेगळ्या सीईटी परीक्षेचे सराव पेपरदेऊ न शकणाऱ्या जिल्ह्यातील होतकरू विद्यार्थ्यांना आता ही संधी नि:शुल्क मिळणार आहे. शिवसेनेची युवा शाखा असलेल्यायुवासेनेतर्फे ही मॅाक टेस्ट येत्या २९ मार्च रोजी गडचिरोली आणि आरमोरी या दोन केंद्रांवर होणार आहे.
युवा सेनेचे गडचिरोली जिल्हा विस्तारक शुभम सोरते यांनी यासंदर्भातील माहिती येथे पत्रपरिषदेत दिली. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वासुदेव शेडमाके, विधानसभा संघटक नंदू कुमरे, जिल्हा युवा अधिकारी पवन गेडाम, तालुका युवा अधिकारी चेतन उरकुडे, तसेच गणेश धोटे, चेतन मालखेडे, पप्पू शेख, वैभव सातपुते आदी पदाधिकारी उपस्थित होते.
गडचिरोलीत शिवाजी सायन्स कॅालेज, गोकुळनगर आणि आरमोरीत हितकारीणी महाविद्यालयात ही मॅाक टेस्ट होणार आहे. हीमॅाक टेस्ट खऱ्याखुऱ्या नीट आणि इंजिनिअरिंग, फार्मसी, लॅा अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या सीईटी परीक्षेच्याधर्तीवर होणार आहे. त्या परीक्षा कशा असतात याची माहिती व्हावी आणि विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी हे आयोजनकेले असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
ही मॅाक टेस्ट देऊ इच्छिणाऱ्यांनी अॅानलाईन रजिस्ट्रेशन करावे. त्यासाठी कोणतेही शुल्क घेतले जाणार नाही. अधिक माहितीसाठीगडचिरोली (9511829012), आरमोरी (7385610989) आणि चामोर्शीतील विद्यार्थ्यांनी (8766982312) या क्रमांकावरसंपर्क करावा.