April 26, 2025

कुरखेडा तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना तात्काळ पाच ब्रास रेती उपलब्ध करून देण्याची मागणी

दोन दिवसात रेती उपलब्ध करून देवू . तहसीलदार कुंभरे यांची भाजपा शिष्टमंडळाला आश्वासन”

कुरखेडा, २६ मार्च : केंद्र आणि राज्य सरकार यांच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजना ,शबरी योजना ,रमाई योजना ,मोदी आवास योजना व इतर योजनेअंतर्गत तालुक्यातील हजारो घरकुल मंजूर करण्यात आले असून या लाभार्थ्यांना घरकुल बांधकाम पूर्ण करण्यासाठी रेतीची नितांत आवश्यकता आहे रेती अभावी घरकुल बांधकाम थांबले असून या घरकुल लाभार्थ्यांना तात्काळ पाच ब्रास रीती उपलब्ध करून द्यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टी तालुका कुरखेडा च्या शिष्टमंडळाने तहसीलदार रमेश कुंभरे यांची भेट घेऊन घरकुल लाभार्थ्यांची व्यथा सांगून तात्काळ पाच ब्रास रेती त्यांना देण्यात यावी असे निवेदन उपविभागीय अधिकारी रणजीत यादव व तहसीलदार रमेश कुंभरे यांना देण्यात आले.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष चांगदेव फाये भाजपा ओबीसी जिल्हा महामंत्री रवींद्र गोटेफोडे,भाजपा शहर अध्यक्ष सागर निरंकारी, प्रा.विनोद नागपूरकर, भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष उल्हास देशमुख शहर महामंत्री राहुल गिरडकर, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मोनेश मेश्राम, शहर महामंत्री मंगेश मांडवे उपस्थित होते.
यावेळी भाजपा शिष्टमंडळाने तालुक्यातील हजारो घरकुल लाभार्थ्यांच्या रेतीच्या समस्या ऐकून रेतीच्या समस्येचे निवारण तात्काळ व्हावे व घरकुल लाभार्थ्यांना तात्काळ रेती उपलब्ध करून द्यावे , घरकुल लाभार्थ्यांना रेती उपलब्ध होत नसल्याने अनेक लाभार्थ्यांचे कामे प्रलंबित असून आपण आपल्या स्तरावरून योग्य कारवाई करून घरकुल लाभार्थ्यांना रेती उपलब्ध करून द्यावे तसेच इतर नागरिकांच्या घरकामांना तसेच शासनाच्या मंजूर विकास कामांना रेती उपलब्ध करून देण्यासाठी डेपो मंजुरी करण्यात यावे व रेती करता घरकुल लाभार्थ्यांना व नागरिकांना होणारा त्रास दूर करावा अशी विनंती करण्यात आली.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!